Advertisement
राजकीय

गॅस सिलिंडर बुकिंगचा नंबर बंद येतोय ? बुकिंग होत नाही ? मग अशी करा तात्काळ बुकिंग ! जास्त पैशांची मागणी झाल्यास करा कॉल

जळगाव/भुसावळ – मोबाईल फोनवरून गॅस सिलिंडर बुकिंग होत नाही ? इस्राएल अमेरिका – इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर LPG गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या मागणीमुळे IVRS लाईन व्यस्त राहत असल्याने अनेकांना अडचण येत आहे. पण आता घाबरण्याची गरज नाही! इंडेन (Indane), एचपी (HP Gas) आणि भारत गॅस (Bharat Gas) ग्राहकांसाठी WhatsApp, मोबाईल ॲप्लिकेशन  आणि SMS या तीन सोप्या डिजिटल पद्धती उपलब्ध आहेत. या पद्धतींनी घरबसल्या काही मिनिटांत बुकिंग करू शकता. मात्र ग्राहकांनी व्हाट्सॲप, फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बुकिंग च्या नावाखाली व्हायरल होणाऱ्या apk फाईल द्वारे बुकिंग करू नये. तसे केल्यास बँक खात्यातील रक्कम गायब होऊन आर्थिक नुकसान होऊ शकते.म्हणून अधिकृत गॅस सिलिंडर बुकिंग एप्लीकेशन्स आणि नंबर्सद्वारेच गॅस बुकिंग करण्याची खबरदारी घ्यावी.
१. WhatsApp द्वारे गॅस बुकिंग (सर्वाधिक सोपी आणि जलद)
रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरूनच मेसेज पाठवा. ऑटोमॅटिक चॅटबॉट मार्गदर्शन करेल.
Indane Gas→ 7588888824 या नंबरवर “REFILL” असा मेसेज पाठवा.
HP Gas → 9222201122 या नंबरवर “Hi” किंवा “Book” मेसेज पाठवा.
Bharat Gas → 1800224344 या नंबरवर “Hi” किंवा “Book” मेसेज पाठवा.
मेसेज पाठवल्यानंतर स्टेप्स फॉलो करा, बुकिंग आयडी मिळेल आणि कन्फर्मेशन येईल.
२. मोबाईल Apps द्वारे गॅस बुकिंग अशी…
स्मार्टफोन असल्यास ही पद्धत खूप सोयीची आहे. एकदा रजिस्टर केल्यानंतर सहज बुकिंग, पेमेंट आणि स्टेटस तपासता येतो.
UMANG अॅप (सरकारी अॅप) → LPG सेवा निवडा → कंपनी निवडा → कंझ्युमर नंबर किंवा मोबाईल नंबर टाका → बुक करा.
Paytm, PhonePe, Amazon Pay→ Utilities/Bill Payments → LPG Gas → कंपनी निवडा → कंझ्युमर नंबर एंटर करा → बुकिंग आणि ऑनलाइन पेमेंट करा.
या अॅप्समध्ये बिल पेमेंट, डिलिव्हरी स्टेटस आणि सबसिडी माहितीही मिळते.
३. SMS द्वारे गॅस बुकिंग (इंटरनेट नसल्यास उपयुक्त)
फक्त SMS पाठवून बुकिंग होते, कन्फर्मेशन मेसेज येतो.
Indane Gas→ रजिस्टर्ड नंबरवरून 7718955555 वर
“REFILL”SMS पाठवा.
Bharat Gas → 7715012345 किंवा 7718012345 वर “LPG”SMS पाठवा.
HP Gas → 8888823456 वर “HPGAS” SMS पाठवा (किंवा IVRS साठी 8888823456 डायल करा).
फोन कॉलने अडचणी का येतात?
– जास्त कॉलमुळे लाईन व्यस्त.
– रजिस्टर्ड मोबाईल नंबर अपडेट नसणे.
– नेटवर्क/तांत्रिक समस्या.
डिजिटल बुकिंगचे फायदे
– २ ते ४ दिवसांत उपलब्ध
– काही मिनिटांत पूर्ण
– स्टेटस तपासता येतो
– ऑनलाइन पेमेंट सुविधा
– रांग किंवा वेटिंग टाळता येते

कोणीही नियमबाह्यपणे बुकिंग संदर्भात जास्त पैशांची मागणी केल्यास जवळच्या तहसीलदार कार्यालय किंवा आम्हाला कॉल करावा. 9820203031

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button