जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

आज जिल्ह्यात शरद पवार, प्रकाश आंबेडकरांच्या सभा तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा

जळगाव ,दिनांक:3 मे, आज जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन बड्या राष्ट्रीय नेत्यांच्या जाहीर सभा होणार असून यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे. आज सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या समर्थनार्थ चोपडा शहरात जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर ते सायंकाळी चार वाजेला भुसावळ येथील संतोषी माता सभागृहात माजी आमदार संतोष चौधरी यांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सात वाजेला मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या यजमानार्थ मुक्ताईनगर शहरात शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. आता जनता या नेत्यांच्या जाहीर सभांना कसा प्रतिसाद देते हे आणि औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण आता भुसावळ शहरासह जळगाव जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून जिल्ह्याच्या तापमानाचा पारा हा 44 अंश सेल्सिअस वर पोहोचलेला आहे.अशा रखरखत्या कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांची लाहीलाही होतांना दिसत आहे. त्यामुळे एकीकडे उन्हाचे तापमान वाढत असताना बड्या राजकीय नेत्यांच्या सभांमुळे निवडणूकांचे तापमान देखील वाढताना दिसून येत आहे.
7 ते 11 तारखेपर्यंत यलो अलर्ट
जळगाव जिल्ह्याचे तापमान हे राज्यात सर्वाधिक नोंदवलेले गेले असून दिनांक 7 मे पासून ते 11 मे पर्यंत तापमानाचा पारा हा 46 अंशापर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला असून याचवेळी ऐन निवडणूकांच्या धामधुमीत उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शहा किंवा नितीन गडकरी यांच्या जळगाव जिल्ह्यात सभा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वादळीवाऱ्यासह गारपीटीचा अंदाज
राज्यामध्ये 6 मेपर्यंत हवामान कोरडं वातावरण राहणार आहे. 6 मेपर्यंत राज्यात तापमानाचा पारा वाढताच राहणा आहे. त्यानंतर 7 मे ते 11 मे दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे. 7 ते 11 मे दरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह, विजेच्या गडगडाटासह गार अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार, तर काही ठिकाणी गारपीट होणार असल्याचाही अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
कसा असेल यंदाचा मान्सून?
स्कायमेट वेदर (Skymet Weather) या हवामानाचा अंदाज देणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार, यंदा समाधानकारक मान्सून पाहायला मिळेल. यंदा पावसाळ्यात पर्जन्यमान चांगलं राहणार आहे. नेहमीच्या सरासरी च्या 102 टक्के  म्हणजे सर्वसाधारण पाऊस पडेल, असा स्कायमेट वेदरने वर्तवला आहे. एल निनोचं (El Nino) ला निनो (La Nina) मध्ये रुपांतर होत असल्याने महाराष्ट्राच्या अवर्षणग्रस्त भागातही चांगल्या पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

ला निनोमुळे चांगल्या पावसाची शक्यता
गेल्या वर्षी 2023 मध्ये कमकुवत मान्सून पाहायला मिळाला मात्र,  यंदा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो कमजोर होऊ लागला आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निना परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे यंदाचा मान्सूनचा पाऊस गेल्या वर्षीपेक्षा चांगला असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button