
भुसावळ दि-04/05/2025, शहरातील तार ऑफिस परिसरातील एका हॉटेलजवळ भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत २ तरुणांकडून कमरेला लावलेले २ गावठी कट्टे आणि ७ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार तार ऑफिसजवळील एका हॉटेलजवळ पोलीस पथकाने सापळा रचला. तेथे एक तरुण संशयास्पद स्थितीत उभा होता. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता झडतीत त्याच्याकडे 1 गावठी कट्टा व 4 जिवंत काडतूस उतूस आढळून आले. या तरुणाने त्याचे नाव ऋतिक उर्फ गोलू भगवान निंदाने (वय २४, रा. वाल्मीक नगर, भुसावळ) असे सांगितले. तसेच तो आणखी एका तरुणाची वाट पाहत होता. पोलिसांनी तेथेच थांबून त्या तरुणाला ही ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव सुमित भानुदास सोलसे (वय २५, रा. डॉ. आंबेडकर नगर, भुसावळ) असे सांगितले. त्याच्याही कडूनही 1 गावठी कट्टा आणि 4 जिवंत काडतूसे असा एकूण 32000 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पो.नि. उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक विजय गायकवाड, विनोद नेवे, दीपक कापडणे, जाकीर मंसूरी, दीपक शेवरे, राहुल भोई, भूषण चौधरी, सुबोध मोरे, संजय ढाकणे, गजानन पाटील, राहुल बेनवाल यांच्या पथकाने केली आहे.