Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्र

भुसावळात महिलेचा पाठलाग केल्याप्रकरणी एका विरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; आरोपीचा राजकीय दबावाचा दावा

भुसावळ (जळगाव) : शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते केदार वामन सानप (वय वर्षे अंदाजे ५०, रा. रानातला महादेव, हुडको कॉलनी, भुसावळ) यांच्याविरोधात एका ४० वर्षीय महिलेचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी घडला असून, तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
महिलेच्या फिर्यादीनुसार, ती आपल्या मुलासह तहसील कार्यालयाकडे जात असताना यावल रोड परिसरात केदार सानप यांनी तिचा पाठलाग केला. यावेळी त्यांनी वाईट नजरेने पाहणे, अश्लील हावभाव व इशारे करणे असे कृत्य केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे महिला भयभीत झाली असून, यापूर्वी दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचाही उल्लेख फिर्यादीत आहे.
दरम्यान, केदार सानप यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. “हा गुन्हा राजकीय दबावाखाली दाखल करण्यात आला आहे. मी अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य व माहिती अधिकाराचा वापर करून शासकीय अनियमिततेविरोधात तक्रारी करतो. त्यामुळे माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी हे खोटे आरोप केले जात आहेत. आरोप करणाऱ्या महिलेला मी ओळखतही नाही. घटनेच्या वेळी मी तहसील कार्यालयात माहिती अधिकार सुनावणीसाठी उपस्थित होतो. यापूर्वीही त्यांनी माझ्यासह माझ्या मुलाविरोधात खोट्या तक्रारी केल्या आहेत. मी याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महानिरीक्षक, अधीक्षक व उपअधीक्षकांकडे न्याय मागणार आहे.” असे सानप यांनी म्हटलेलं आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, फिर्याद व प्रतिवादी यांच्या बाजू ऐकल्यानंतर पुढील तपास सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही बाजूंच्या दाव्यांची चौकशी केली जाईल.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Join WhatsApp