संजय गांधी निराधार योजनेच्या प्रकरणांना मंजूरी मिळावी- सौ.रोहिणीताई खडसे

मुक्ताईनगर- समाजातील अंध, अपंग विधवा, परितक्ता, निराधार व्यक्तीना मदत म्हणून शासनातर्फे संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना याद्वारे मासिक वेतन देऊन मदत दिली जाते.सदर योजनांच्या पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणाला मंजुरी मिळुन लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी तालुकास्तरावर एक समिती स्थापन केलेली असते त्याचे सचिव हे तहसीलदार असतात, परंतु गेल्या एक वर्षापासून सदर समिती स्थापन केली गेली नसल्याने तसेच निवडणुक आचारसंहिता, कोरोना महामारी या बाबी मुळे नविन प्रकरणाना मंजुरी मिळत नसल्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील तसेच इतर तालुक्यातील या योजनांचे नविन पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभा पासून वंचित राहत आहेत
गेल्या सात महिन्या पासुन लॉकडाउन असल्यामुळे कुठलाही रोजगार उपलब्ध नाही व या योजनांचा लाभ सुद्धा मिळत नाही आहे त्या कारणाने याअंध, अपंग विधवा, परितक्ता, निराधार व्यक्तिवर उपासमारीची पाळी आली आहे.म्हणून समिती स्थापन नसली तरी तहसीलदार यांना पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणाला मंजुरी देण्याचे अधिकार आहेत हि बाब लक्षात घेऊन मुक्ताईनगर तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेच्या मंजुरी साठी तहसील कार्यालयाकडे प्रकरण केलेले आहे त्यातील पात्र लाभार्थ्यांचे प्रकरणास आपल्या स्तरावर कार्यवाही करून मंजुरी देण्यात यावी आणि आतापर्यंत मंजुर असलेल्या सदर योजनांच्या लाभार्थ्यांना गेल्या काही महिन्यांपासून सदर योजनेचे वेतन मिळाले नाही आहे ते त्वरित देण्यात येऊन या योजनेतील लाभार्थी असलेले अंध, अपंग विधवा, परितक्ता, निराधार व्यक्तीवर आलेली उपासमारीची वेळ दुर करावी.यासाठी श्री.शाम वाडकर तहसीलदार मुक्ताईनगर यांना जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा ॲड.सौ. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी निवेदन दिले.यावेळी प.स. सभापती विद्याताई पाटील, बाजार समिती सभापती निवृत्तीभाऊ पाटील, माजी प स सभापती राजुभाऊ माळी,प स सदस्य राजेंद्र सवळे,प्रदीप साळुंखे,चंद्रकांत भोलाने, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, माजी जि प सदस्य सुभाष पाटील, सुनिल काटे,निलेश मालवेकर,शिवराज पाटील, विनोद पाटील उपस्थित होते.