Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त महिलेचा खून करून हडपलेले 30 लाख मयताच्या वारसांना दिले परत ,दोघांना अटक

जळगांव तालुका पोलीस स्टेशन CCTNS गुरनं. 312/2024, भारतीय न्याय सहिता 2023 चे कलम 103 (1) 61 (2), 238, 3 (5) आरोपी क्र. 1) जिजाबराव अभिमन्यु पाटील  रा.खडकीसिम ता चाळीसगांव हम. मुदडा नगर, प्लॉट नं. 22 कस्तुरा बाग, अमळनेर व क्र. 2) विजय रंगराव निकम वय 46 रा. विचखेडा ता. पारोळा जि.जळगांव हमु.भालेराव नगर, अमळनेर जि जळगांव यांचे विरुध्द दिनांक 02/09/2024 रोजी गुन्हा दाखल आहे. दिनांक 20 / 08 / 2024 रोजीचे सांयकाळी 19.16 चे नंतर ते दिनांक 02/09/2024 रोजीच्या दरम्यान खोटेनगर जवळ, प्लॉट नं. 13, गट न. 103, जळगांव येथून यातील आरोपी क्र. जिजाबराव अभिमन्यु पाटील व आरोपी क्र. 2) विजय रंगराव निकम दोन्ही नेमणुक जिल्हा परिषद जळगांव रा अमळनेर ता अमळनेर जि जळगांव यांनी यातील मयत स्नेहलता अंनत चुंबळे (माहेरकडील नाव) सेवानिवृत्त  रा धनश्री नगर, मोबाईल टॉवर समोर खोटे नगर जवळ, प्लॉट नं. 13, गट न. 103, जळगांव ह मु. राणे नगर, राजीव नगर, रुदम बिल्डींग समोर, कृष्णा अपार्टमेंट समोर, बी-विंग, प्लॅट नं. 13, नाशिक हिचे जवळ असलेले 30 लाख रुपये रक्कम मिळविण्याच्या लालसा पोटी आरोपी क्र.1 व 2 यांनी कट रचुन संगनमत करुन मयतास जिवे ठार मारुन तिचे प्रेताची कुठेतरी विल्हेवाट लावली आहे. वगैर फिर्याद वरुन जळगांव तालुका पोलीस स्टेशनला वरप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयांचे तपासात जळगांव तालुका पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी यांनी दोन्ही आरोपीतांना अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवून पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आरोपीतांकडून त्यांनी मयत नामे स्नेहलता अनंत चुंबळे हिचे जवळुन लालसा पोटी घेतलेले 30 लाख रुपये रक्कम हस्तगत करुन जळगांव तालुका पोलीस स्टेशन येथे जप्त करण्यात आली होती. सदर जप्त 30 लाख रुपये रक्कम मा. मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, जिल्हा व सत्र न्यायालय, जळगाव यांचेकडील आदेश जा. क्र. मजाक्र. क्र.220/2025 दिनांक 19/06/2025 अन्वये यातील अर्जदार तथा फिर्यादी 1) समीर अलियास सौरभ संजय देखमुख वय 28 व्यवसाय खाजगी नोकर व 2) संजय नानासाहेब देखमुख वय 61 व्यवसाय – खाजगी नोकर दोन्ही रा.धनश्री नगर, मोबाईल टॉवर समोर खोटे नगर जवळ, प्लॉट नं. 30, गट न. 103, जळगांव यांचे ताब्यात परत देणे बाबत मा. न्यायालयाचा आदेश झाल्याने सदरची 30 लाख रुपये रक्कम हि दिनांक 23/06/2025 रोजी मा पोलीस अधिक्षक सो, जळगांव यांचे हस्ते अर्जदार यांचे ताब्यात देण्यात आली आहे.
सदरची कारवाई हि मा पोलीस अधिक्षक सो,जळगांव श्री महेश्वर रेडडी सो, मा अपर पोलीस अधिक्षक  जळगांव,  उपविभागीय पोलीस अधिकारी  श्री संदीप गावीत सो यांचे मार्गदर्शनाखाली जळगांव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संजय पुंजाजी गायकवाड, लेखनिक हवालदार मपोहेकॉ / 2682 प्रविणा जाधव, पोहेकॉ / 1794 प्रविण पाटील व पोकों / 1353 गणेश पाटील यांनी केलेली आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button