Advertisement
राजकीय

भुसावळ नगरपरिषदेत अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य यांना संतोष थामेत यांनी सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी दिले निवेदन

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड धर्मपाल उपाध्याय यांनी आज भुसावळ नगरपरिषदेत भेट देऊन आढावा बैठक घेऊन कामांची पाहणी केली.

दरम्यान, याप्रसंगी नगरपरिषदेसमोर अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे प्रदेश सचिव संतोष थामेत हे सफाई कामगारांच्या न्याय व हक्कांच्या प्रलंबित विविध प्रकारच्या मागण्यांसाठी कालपासून आमरण उपोषणाला बसलेले असून संतोष थामेत यांनी ॲड धर्मपाल उपाध्याय यांची भेट घेऊन सर्व सफाई कामगार हे अनुसूचित जातीचे असून नियमित कायम कामगार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपदानाची रक्कम, अंशराशीकरणाची रक्कम, पेंशन विक्रीच्या रकमांपासून दिर्घकाळ वंचित ठेवण्यात येते. विशेष म्हणजे अनुसूचित जातीच्या सफाई कामगारांसाठी असलेला निधी अन्य दुसऱ्या विभागाच्या कामांसाठी नियमबाह्य पद्धतीने आस्थापना विभागाकडून वर्ग करून खर्च केला जात असल्याचा दावा संतोष थामेत यांनी ॲड धर्मपाल उपाध्याय यांच्याकडे केला आहे.या प्रकाराची तात्काळ दखल घेत त्यांनी मुंबईत यासंदर्भात १८ जून रोजी बैठक बोलावून संबंधित अधिकारी व उपोषणकर्ते यांची सुनावणी घेऊन दोषींवर उचित कार्यवाही करून सफाई कामगारांच्या विविध प्रकारच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी आश्वासन दिलेले आहे.


याप्रसंगी ॲड धर्मपाल उपाध्याय यांना भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले, आस्थापना विभागातील प्रमुख वैभव पवार,अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा उपोषणकर्ते संतोष थामेत, जिल्हाध्यक्ष राकेश बारसे, जिल्हा उपाध्यक्ष विजय तेजकर, नरेश बिऱ्हाडे जिल्हा सचिव , मयूर सुरवाडे शहराध्यक्ष, त्यागी नन्नवरे , सीमा थामेत व भुसावळ नगरपालिकेचे सफाई कर्मचारी उपस्थित होते.
या सर्वांच्या उपस्थितीत मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button