जळगावमहाराष्ट्रराजकीय

भुसावळ विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून यावेळी महिलेला उमेदवारी ? तयारीला लागण्याचे आदेश

जळगाव दि-०६/०९/२०२४ – संपूर्ण राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले असून जळगाव जिल्ह्यात सुद्धा त्या वाऱ्यांनी आता जोरदार दिशा पकडलेली दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील एकमेव अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या भुसावळ विधानसभा मतदार संघात यावेळी देखील मोठी चुरस बघायला मिळणार आहे. या मतदारसंघात 2009 या वर्षापासून सलग तीन टर्म पासून भाजपचे विद्यमान आमदार संजय सावकारे हे विधानसभा सदस्य म्हणून निवडून येत आहे. गेल्या तीन टर्मपासून आमदार संजय सावकारे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या पुरुष आमदाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असूनही सलग 10 वर्षांपासून पराभव होत आल्यामुळे यावेळी पक्षश्रेष्ठींनी भुसावळ विधानसभा मतदारसंघासाठी नवीन संभाव्य राजकीय रणनीती आखलेली असून यावेळी महिला उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे नवीन डावपेच आखण्याचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नेहमी त्यांच्या निवडणुकीच्या विशेष व्यूहरचनेमुळे भल्याभल्या उमेदवारांना पराभूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या वेळी भुसावळ विधानसभा मतदार संघासाठी थेट ‘सिल्वर ओक’ वरून उमेदवारीसाठी भेटीगाठी घेऊन ‘फिल्डींग’ लावली जात असून त्याचा प्रत्यय आता समोर दिसू लागलेला आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे जास्तीत जास्त ठिकाणी पक्षकार्यात व सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी असणाऱ्या सक्षम महिला उमेदवारांना संधी देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी विशेष रणनीती आखायला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.

त्यादृष्टीने आता राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केलेली असून भुसावळ विधानसभा मतदारसंघातून सुद्धा सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षा सौ. संगीता राजेंद्र भामरे रा.गांधीनगर, भुसावळ ता.भुसावळ यांनी नुकतीच दिनांक 1 सप्टेंबर रोजी मुंबईत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची यांच्या “सिल्वर ओक ” येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे.तसेच जळगाव जिल्हा महानगराध्यक्ष एजाज मलिक, जिल्हा महानगर कार्याध्यक्ष यांच्याकडे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या भुसावळ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार म्हणून दावा दाखल केला आहे.


निवडणूकीच्या तयारीला लागण्याचे आदेश
पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीत सौ. संगीता भामरे यांनी त्यांच्या विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षसंघटनेसाठी केलेल्या राजकीय कार्याची माहिती देऊन आपण भुसावळ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार असून यावेळी महिलेला संधी देण्याची विनंती केलेली आहे. त्यावर सकारात्मक विचार करण्याचे संकेत शरद पवार साहेबांनी दिलेले असून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागून मतदार संघातील प्रत्येक गावात जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीसाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदेशित केलेले आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत झालेल्या भेटीत देखील उमेदवारी संदर्भात सकारात्मक चर्चा झालेली असून निवडणूकीच्यादृष्टीने आता सौ संगीता भामरे यांनी भुसावळ विधानसभा मतदारसंघातील गावांना भेटी देऊन एक विकासाचे व्हिजन सोबत घेऊन मतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौरे सुरू केलेले आहेत.
राष्ट्रवादीकडून महिलेला संधी शक्य ?
गेल्या काही  दशकांपासून भुसावळ विधानसभा मतदार संघात महिलेला आमदार होण्याची संधी मिळालेली नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सुद्धा आजपर्यंत कोणत्याही महिलेला विधानसभेची उमेदवारी देण्यात आलेली नसल्याने आणि विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरुष उमेदवारांचा टिकाव न लागता सतत दारूण पराभव होत आल्यामुळे आमदार संजय सावकारे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून महिला उमेदवार देण्यासाठी रणनीती आखायला खासदार सुप्रिया सुळे यांनी विशेष व्यूहरचना आखण्याचे संकेत दिले आहे. असे झाल्यास गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादीकडून या विधानसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून इच्छुक असणाऱ्या पुरुष कार्यकर्त्यांचा हिरमोड होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. 2014 मध्ये राजेश झाल्टे पराभूत झाले होते ,तर गेल्यावेळी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जगन सोनवणे यांना 20245 मते मिळाली होती. दोन्ही वेळी पुरुष उमेदवारांचा दारुण पराभव झाल्यामुळे यावेळी राष्ट्रवादीकडून नवीन रणनीतीनुसार महिलेला उमेदवार म्हणून संधी मिळण्याची दाट शक्यता जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button