रक्षा खडसे मंत्री असताना नाथाभाऊंना ‘लखपती दीदी’ च निमंत्रणच नाही ! आ.खडसे हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार का ?
भाजपने आ.खडसेंच महत्त्व कमी केलं ?
जळगाव,दि-25/08/2024, आज जळगाव शहरातील ‘प्राईम इंडस्ट्रियल पार्क’ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या ‘ लखपती दीदी संमेलनाचे मोठ्या थाटात लखपती दीदी कार्यक्रमाचे या आयोजन करण्यात होते. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतरही अनेक कॅबिनेट मंत्री, जळगाव जिल्ह्यातील विधानसभा व विधानपरिषद सदस्य असलेल्या मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे. मात्र अशातच जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे.
दरम्यान, विधानपरिषदेचे सदस्य असलेले आ. एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन गेल्या पाच महिन्यांपासून भाजपमध्ये प्रवेशासाठी आतुरतेने वाट बघत आहे. मात्र भाजपचे प्रवेशद्वार आ.खडसेंसाठी अजूनही उघडे होत नसल्याने त्यांचा भाजप प्रवेश रखडलेलाच आहे. ते भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमात अजून तरी दिसून आलेले नाहीत. त्यांचा भाजप प्रवेश रखडलेला असला तरी आज झालेल्या शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर त्यांचे नाव दिसून आलेले नाही. तसेच आज पार पडलेल्या या भव्यदिव्य शासकीय कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही जिल्हा प्रशासनाकडून आपल्याला मिळाले नसल्याचे आ.एकनाथराव खडसे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत व्यक्त केले आहे. त्यामुळे आ. एकनाथराव खडसे यांना त्यांच्या जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमापासून हेतूपुरस्सर डावलून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा जळगाव जिल्हा प्रशासनाचा हेतू होता का ? अशी शंका आता आ. एकनाथराव खडसेंच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ नेते असलेले आणि सध्या राज्याच्या वरीष्ठ विधान मंडळ असलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून आ. एकनाथराव खडसेंना असलेल्या विशेषाधिकारांचा भंग झालेला आहे का ? आणि आमदार एकनाथराव खडसे हे या त्यांच्या झालेल्या अवमानाविषयी हक्काभंगाची तक्रार विधानपरिषद उपाध्यक्षांकडे करणार आहे का ? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहे. जळगाव जिल्हा प्रशासनाने या शासकीय कार्यक्रमाचे त्यांना जाणीवपूर्वक निमंत्रण नाकारले आहे का ? त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे का ? त्यामुळे आता या घटनेत काय घडामोडी घडतात ? काही ठोस कार्यवाही होईल का ? की या प्रकरणाकडे आ. एकनाथराव खडसे हे दुर्लक्ष करतील ? याकडे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह जिल्हा प्रशासनातील अधिकारी व पत्रकारांचे बारीक लक्ष लागून आहेत.
विशेष म्हणजे त्यांच्या स्नुषा आणि केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या ना.रक्षा खडसे यांचे केंद्र सरकारमध्ये राजकीय वजन वाढलेलं असताना देखील त्यांचे सासरे आ.एकनाथराव खडसेंसोबत अशी कथित अवमानजनक घटना घडलेली आहे. त्यामुळे ना.रक्षा खडसेंची त्यांच्या घरातील जेष्ठ सदस्यांसोबत घडलेल्या या कथित घटनेबाबत त्यांची भूमिका काय आहे ? याबाबत त्यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.