जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे जळगाव विमानतळावर आगमन ; ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले स्वागत

जळगाव दि-09/09/2024 -महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आज संध्याकाळी 9  सप्टेंबर रोजी जळगाव विमानतळावर आगमन झाले. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्वागत केले. तसेच खा. स्मिता वाघ, आ. चिमणराव पाटील, आ.सुरेश भोळे यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, महानगर पालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनीही स्वागत केले.
   विमानतळावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना जिल्हा पोलिस दलाकडून मानवदंना देण्यात आली.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button