जळगाव दि-14 मे- जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात काल झालेल्या मतदानाची टक्केवारी व विस्तृत आकडेवारी आता समोर आलेली असून रावेर लोकसभेसाठी 63% मतदान झालेले असून जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 57.70% मतदान झाल्याची माहिती जळगाव जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली आहे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 52 % मतदान झालेले असून ही प्रस्थापित नेत्यांना मोठा धक्का देणारी बाब ठरणार आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान
1) चोपडा विधानसभा -61.52%
2) रावेर विधानसभा -67.77
3) भुसावल विधानसभा-57.33
4) जामनेर विधानसभा-60.18
5) मुक्ताईनगर विधानसभा -64.56
6) मलकापूर विधानसभा-67.36
असे रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण 63.01% मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली आहे. तसेच 18% तृतीय पंथी मतदारांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे. तसेच भुसावळ विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 57.33% मतदान झाल्याची माहिती समोर आलेली आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान
1) जळगाव शहर-52.90
2) जळगाव ग्रामीण-62.60
3) अमळनेर-55.94
4) एरंडोल-61.76%
5) चाळीसगाव-55.01%
6) पाचोरा -59.82%
असे जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 57.70% मतदान झाल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली आहे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 52% मतदान झालेले दिसून येत आहे.