जळगाव दि. 13 मे- भारतीय लोकशाहीतला सर्वात मोठा उत्सव ही निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी अठरा वर्षाच्या वरील प्रत्येक नागरिकांना त्यांच्या मताचा अधिकार आहे. समाजातील दुर्लक्षित घटक जसे सेक्सवर्कर, तृतीय पंथी यांच्या मतासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार निवडणूक प्रशासनाकडून मोठे प्रयत्न झाले. जळगाव जिल्ह्यातील सर्व सेक्सवर्कर यांना त्यांच्या मताचे महत्व पटवून देण्याचे काम महिला व बालकल्याण विभागाने आधार बहुद्देशीय संस्था अमळनेर आणि विप्रो इंटरप्रायझेस यांच्या समन्वयाने केले. आणि सेक्सवर्करनी 100 टक्के आपल्या मताचा हक्क बजावला अशी माहिती जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी वनिता सोनगत यांनी दिलेली आहे.
सखी वनस्टॉप सेंटरमध्ये असलेल्या महिलांनाही बजावला मताचा हक्क सखी वन स्टॉप सेंटर मध्ये समुपदेशनसाठी येणाऱ्या 16 महीला यांनी मतदान केले आहे. तसेच कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत समुपदेशन सेंटर मध्ये आलेल्या पीडित 24 महिलांचे मतदान झाले. सहा महिला बाहेरगावी व काहीचे मतदान गुजरात मध्ये असल्यामुळे होऊ शकले नाही नाही. या सर्व महिलांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेवरून मतदानासाठी जागृत करण्यात आले. अशी माहितीही सोनगत यांनी दिलेली आहे.