राजकीयराष्ट्रीय

राजस्थानात दोन मुस्लिम आमदारांनी संस्कृतमध्ये घेतली शपथ, देशातील पहिलीच घटना

जयपूर (वृत्तसंस्था) दि-20, राजस्थानात काही दिवसांपूर्वी विधानसभेच्या निवडणुका होऊन निकाल लागल्यानंतर भाजपाचे सरकार सत्तारूढ झालेले आहे.भाजपाच्या शीर्ष नेतृत्वानं अननुभवी भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री करून आश्चर्याचा धक्का दिला होता. राजस्थानच्या 16 व्या विधानसभेचे पहिले अधिवेशन बुधवारी बोलावण्यात आले. त्यावेळी नवीन आमदारांना काळजीवाहू विधानसभा अध्यक्षांनी शपथ दिली. यादरम्यान डिडवाना मतदारसंघातून भाजपाने टिकिट नाकारल्याने अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झालेले आमदार युनूस खान यांनी संस्कृतमध्ये शपथ घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सोबतच कांग्रेसचे दुसरे आमदार जुबेर खान यांनीही संस्कृत भाषेत शपथ घेत युनूस खान यांच्या पावलावर पाऊल ठेवले, आणि सर्वांनाच आश्चर्याचा जोरदार धक्का दिला,कारण यापूर्वी देशातील कोणत्याही मुस्लिम लोकप्रतिनिधीने निवडून आल्यानंतर संस्कृत भाषेत शपथ घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
राजस्थानच्या राजकारणात युनूस खान हे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. डिडवाना येथून तिकीट न मिळाल्याने खान यांनी तेथूनच अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यांना 70, 952 मते मिळाली. त्यांनी काँग्रेसच्या चेतनसिंह चौधरी यांचा 2,392 मतांनी पराभव केला. या जागेवर भाजपाचे उमेदवार जितेंद्र सिंह यांचा 22,138 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. विजयानंतर युनूस खान यांनी देशनोक येथील करणी मातेच्या दरबारात जाऊन दर्शन सुद्धा घेतले होते.

आठ आमदारांची शपथ बाकी
बागी दौरा येथील आमदार महेंद्रजित मालवीय, दंतरामगडचे वीरेंद्रसिंह, रायसिंग नगरचे सोहनलाल नायक, तिजारा विधानसभा मतदारसंघाचे महंत बालकनाथ, नादबाईचे जगतसिंह, बांदिकुईमधून भागचंद टकरा, वैरचे बहूदरसिंह कोळी आणि निंबाहेराचे श्रीचंद कृपलानी यांनी शपथ घेणे बाकी आहे. आतापर्यंत 191 आमदारांनी शपथ घेतली आहे.
13 आमदारांची संस्कृतमध्ये शपथ
राजस्थान विधानसभेत आज भाजपाचे आमदार झोराराम कुमावत, नोक्षम चौधरी, जेतानंद व्यास, पब्बराम विश्नोई, महंत प्रतापपुरी, बाबूसिंह राठोड, दीप्ती मोहेश्वरी, कैलाश मीना, गोपाल शर्मा, छगनसिंह, जोगेश्वर गर्ग, तर काँग्रेसचे जुबेर खान यांच्यासह अपक्ष आमदार युनूस खान यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button