क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई
Trending

रावेर तालुक्यात ६ लाख २१ हजारांची गांजाची शेती उद्ध्वस्त, ९१ किलोची गांजाची झाडे जप्त

जळगाव; दि:- 10/04/2024  लालमाती ते सहस्वलींग गावांचे रोडलगत ता रावेर, शिवारात असलेल्या शेतात गांज्याच्या झाडाची लागवड करुन त्याची जोपासणी करीत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने रावेरचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल सपोनि आशिष अडसुळ, पोउपनि सचिन नवले, पोहेकॉ ईश्वर चव्हाण, जगदीश पाटील,  कल्पेश आमोदकर,  मुकेश मेढे, महेश मंगलदास मोगरे,  विकारोद्दीन गयासोद्दीन शेख, प्रमोद सुभाष पाटील, समाधान कौतीक ठाकुर,  सचिन रघुनाथ घुगे,  सुकेश शब्बीर तडवी, संभाजी रघुनाथ बिजागरे व तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, दोन पंच फोटो ग्राफर, वजन काटेचा मालक अशा संयुक्त पथकाने जाऊन सहस्त्रिलिंग ता. रावेर येथे जाऊन आरोपी नामे (1) अक्रम कासम तडवी (2) शहारुख कासम तडवी दोन्ही रा. सहस्त्रलींग ता. रावेर यांच्या मालकिच्या शेतात गांज्याची लागवड मिळुन आली सदर कारवाई मध्ये गांज्या सदृष्य एकुण 91 किलो 400 ग्रॅम वजनाची झाडे जप्त केले असुन त्याची सदर गांज्याची एकुण किंमत 6,21,520/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपीता विरुध्द फिर्यादी पोना जगदीश लिलाधर पाटील यांच्या फिर्यादी वरुन रावेर पोलीस स्टेशनला गुंगीकारक औषधीद्रव्ये आणी मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (ब), 20 (क) प्रमाणे आरोपी नामे (1) अक्रम कासम तडवी (2) शहारुख कासम तडवी दोन्ही रा. सहस्त्रलींग ता. रावेर यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यापैकि आरोपी शहारुख कासम तडवी यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरिक्षक सचिन नवले हे करीत आहेत.
सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक जळगांव डॉ. महेश्वर रेड्डी सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अशोक नखाते, श्रीमती अन्नपुर्णा सिंह सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेरचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सपोनि आशिष अडसुळ, पोउपनिरीक्षक सचिन नवले  ईश्वर चव्हाण, जगदीश पाटील ,कल्पेश आमोदकर,  मुकेश मेढे, सचिन रघुनाथ घुगे, विशाल शिवाजी पाटील, प्रमोद सुभाष पाटील, महेश मंगलदास मोगरे, समाधान कौतीक ठाकुर, संभाजी ,रघुनाथ बिजागरे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button