ट्विटरची ‘चिमणी’ उडाली भुर्र, नवीन लोगोची एलन मस्कची घोषणा
इलॉन मस्कने ट्विटर (Twitter) विकत घेतल्यापासून कंपनीत सतत काहीना काही बदल करत आहेत. आता इलॉन मस्क यांनी ट्विटरचे रंगरूप बदलले आहे. ट्विटरचा लोगो असलेली चिमणी आता बदलली असून आता इलॉन मस्कने ट्विटरचा नवा लोगो X असा केला आहे.
ट्विटरच्या नवीन लोगोवर देखील Xचे वर्चस्व
इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीत सतत काहीना काही बदल करत आहेत. त्यामुळे त्याचे कौतुक आणि टीकाही झाली. आता इलॉन मस्क ट्विटरची ओळख बदलली आहे.ट्विटरच्या चिमणीची जागा X या लोगोने घेतली आहे. इलॉन मस्कने त्याच्या बहुतेक कंपन्यांच्या नावांमध्ये आणि लोगोमध्ये X या शब्दाचा समावेश केला आहे. त्यामुळे ट्विटरच्या नवीन लोगोवर देखील Xचे वर्चस्व आहे.
अलीकडेच इलॉन मस्कने लॉन्च केलेल्या एका आर्टिफिशिअर कंपनीला xAI असे नाव देण्यात आले आहे. त्याच वेळी मस्कच्या स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन कंपनीचे नाव देखील स्पेसएक्स आहे. आता मस्क देखील X या शब्दाने ट्विटरचा लोगो बदलवला आहे.
अलीकडेच इलॉन मस्कने नवा नियम बनवला आहे, ज्याच्या अंतर्गत साइन इन न केलेले लोक ट्विट पाहू शकणार नाहीत. यापूर्वी, यूजर्सचे प्रोफाइल किंवा ट्विट पाहण्यासाठी ट्विटरवर खाते तयार करण्याची गरज नव्हती. मस्क यांनी या नियमाबाबत युक्तिवाद केला की ट्विटरमधून इतका डेटा येत आहे की सामान्य वापरकर्त्यांच्या सेवांवर नकारात्मक परिणाम होत आहे . त्यामुळेच ह्या नवीन बदलाची प्रक्रिया सुरू झालेली आहे.