आपण भूकंपमुक्त झालेला आहात का ? दिल्लीत शरद पवारांची अनुपस्थिती काय दर्शवते ? उद्धव ठाकरेंची खळबळजनकं उत्तरे
फडणवीसांनी 'मणीपूर फाईल्स' चित्रपट काढावा -ठाकरे
नवी दिल्ली दि-३१ मार्च , दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीने केलेल्या अटकेच्या कारवाईच्या निषेधार्थ आज इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या प्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची दिल्लीत महारॅली आयोजित करण्यात आलेली आहे. या रॅलीवर भाजपने ‘एक्स’ अकाउंट वर पोस्ट करून ही देशातील ‘ठगांची जत्रा’ असल्याची टीका केलेली आहे.
या पोस्टवरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्या भ्रष्ट नेत्यांवर जसे अजित पवार ,प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ ,अशोक चव्हाण, जगमोहन रेड्डी यांसारख्या ठगांवर टीका करत होते. त्या सर्व ठगांना त्यांनी सोबत घेऊन महायुतीत सामील करून सत्तेत सहभागी करून घेतलेलं आहे. त्यामुळे भाजप हा ठगांचा म्होरक्या झालेला आहे.आणी महाविकास आघाडी ही “ठगमुक्त” झालेली आहे. असा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेला आहे.
पुढे पत्रकारांनी विचारले की, आज इंडिया आघाडीची महारॅली आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीत समन्वय दिसत नाही.त्यावर उद्धव ठाकरेंनी महायुतीत तरी कुठे समन्वय दिसतो ? असं गोंधळून जाऊन अजब उत्तर दिलं. पुढे पत्रकारांनी उलट प्रश्न विचारला की, महायुतीत समन्वय नाही म्हणून महाविकास आघाडीत समन्वय ठेवायचा नाही का ? त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या समन्वय नसला तरी भाजपविरोधी आघाडी मजबूत आहे.ते तुम्हाला निवडणुकीच्या प्रचारात दिसून येईल.
पुढे पत्रकारांनी विचारले की ,या महारॅलीत शरद पवारांची अनुपस्थिती आहे, याचा अर्थ कसा काढता ? त्यावर ठाकरे म्हणाले की, पवार साहेबांवर तशी कोणतीही शंका घ्यायची गरज नाही, त्यांची तब्येत वृद्धपकाळामुळे ठीक नसते.
पुढे विचारले की देवेंद्र फडवणीस यांनी असं म्हटलेलं आहे की, राहुल गांधींनी ‘वीर सावरकर’ चित्रपट बघावा मी त्यांचा पूर्ण थिएटर बुक करतो ! यावर ठाकरेंनी जोरदार उत्तर देत म्हटलेलं आहे की, मी देवेंद्र फडणवीस यांचा संपूर्ण खर्च करतो त्यांनी मणिपूरला जाऊन त्यावर ‘मणीपुर फाईल्स’ चित्रपट बनवावा, आणी देशभर रिलीज करावा.
पुढे पत्रकारांनी विचारले की, आपण भूकंपमुक्त झालेला आहात का ? यावर मात्र उद्धव ठाकरेंनी उत्तर देण्याचे टाळून लगेच सारवासारव केली.