मुंबई ,दिनांक – 27 मार्च ,भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची आज सातवी यादी जाहीर केली आहे. या सातव्या यादीतही देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांचे नाव नसल्याने त्यांच्या लोकसभा न लढवण्याच्या संदर्भातील चर्चा सुरू झालेले आहेत. आज झालेल्या टाईम्स नाव समीट समारंभात त्यांना लोकसभा निवडणूक न लढविण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी मोठ विधान केलेलं आहे.
त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला होता की आपलं नाव आतापर्यंत भाजपच्या उमेदवारांच्या कोणत्याच यादीत का आल नाही ? त्यावर त्यांनी म्हटलेलं आहे की मला भाजपच्या पक्षश्रेष्ठ निवडणूक लढवण्या संदर्भात विचारणा केली होती. मला दक्षिण भारतातील एका मतदारसंघाचे सुद्धा नाव सूचविण्यात आले होते. तसेच आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यातील सुरक्षित मतदार संघाबाबत चाचणी सुद्धा करण्यात आली होती.
मात्र मी या गोष्टीवर दहा दिवस सखोल विचार केला. सर्वात आधी माझी अडचण ही होती की ,माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत आणि निवडणूक ही आता जाती आणि धर्माच्या नावावर लढवली जात असल्याने मला ते मुळीच आवडत नाही. म्हणून मी निवडणूक लढविण्यास नकार दिलेला आहे, असं मोठं विधानं निर्मला सीतारामन यांनी आज केलेले आहे. दोन वेळा देशाच्या अर्थमंत्री राहिलेल्या नेत्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नसल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केलेले आहे.