महाराष्ट्रमुंबई

ममता कुलकर्णी बॉलीवूड रिटर्न ! म्हणाली “नसीबमे नही था जो, हमको मिला नही, शिकवा नही किसी से…

मुंबई ,दिनांक-१९/१२/२४, नव्वदच्या दशकात आपल्या जबरदस्त अभिनयाने बॉलीवूडवर अधिराज्य दाबून अनेक सुपरहिट सिनेमे देणाऱ्या आणि नंतर अचानक गायब झालेल्या अनेक बॉलीवूड अभिनेत्री आता तीन दशकानंतर मुंबई रिटर्न होऊ लागलेल्या असून आधी माधुरी दीक्षित, मिनाक्षी शेषाद्री, मंदाकिनी आणि आता त्यात अभिनेत्री ममता कुलकर्णी हिची भर पडलेली आहे. अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर अनेक वर्षे राज्य केलं. पण अभिनेत्री अचानक गायब झाल्यानंतर तिच्याबद्दल तुफान चर्चा रंगल्या. ममता अखेर तब्बल 24 वर्षांनंतर भारतात परतली आहे.नव्वदच्या दशकात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने तिला पळवून नेल्याची चर्चा अनेक वर्षे चर्चेत होती.


भारतात परतल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार ?
याबद्दल अभिनेत्रीला सतत विचारण्यात येत आहे. अशात नुकताच एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने अनेक गोष्टींचा खुलासा केला. शिवाय ड्रग्स प्रकरणी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याबद्दल देखील ममताने मौन सोडलं आहे.
भारतातून गायब होण्याचं कारण सांगत ममता म्हणाली, ‘भारतातून गायब होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अध्यात्म… 1996 मध्ये माझा अध्यात्माकडे कल वाढला आणि त्यादरम्यान माझी भेट गुरू गगन गिरी महाराज यांच्याशी झाली. त्यांच्या आगमनानंतर माझी अध्यात्माची आवड वाढली. यानंतर माझी तपश्चर्या सुरू झाली. 24 वर्षा गायब राहिल्याद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मी मान्य करते बॉलिवूडने मला प्रसिद्धी, संपत्ती दिली. त्यानंतर बॉलिवूडची साथ सुटली. 2000 ते 2012 पर्यंत मी फक्त आणि फक्त तपस्या करत राहिली. अनेक वर्ष मी दुबईत होती. दोन बेडरूमच्या हॉलमध्ये राहत होती आणि 12 वर्षे ब्रह्मचारी राहिले.’ असेही तीने सांगितले.

ममता कुलकर्णी आणि ड्रग्स प्रकरण

अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्याकडे कोणत्या गोष्टीची कमी होती? लोकं असं फक्त पैशांसाठी करतात. तेव्हा माझ्याकडे 10 सिनेमाच्या ऑफर होत्या. माझ्याकडे तीन बंगले आणि दोन गाड्या होत्या. पण मी बॉलिवूडचा त्याग केला.पुढे म्हणाली की, “नसीबमे नही था जो, हमको मिला नही, शिकवा नही किसी से…
विक्कीमुळे किंवा प्रसिद्धीमुळे माझ्यावर ड्रग्ज प्रकरणात खोटा गुन्हा दाखल झाला असं मला वाटतं.’मात्र ज्या अधिकाऱ्याने माझ्यावर कारवाई केली होती, त्याबाबत त्याच्याकडे कुठलेही पुरावे नव्हते,असा दावाही तीने केलेला आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button