यावल तालुक्यातील महामार्गावरील हॉटेलमध्ये अंदाधुंद गोळीबार

यावल तालुक्यातील आडगाव चिंचोली परिसरातील बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील हॉटेल रायबा येथे अज्ञात व्यक्तींनी हाँटेलमध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिस सूत्रांनी दिलेली असून, आता यावर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.आज रात्री 9.30 वाजेच्या सुमारास झालेल्या या गोळीबारात हॉटेलमधील एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलेली असून त्या व्यक्तीला काही जणांनी खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असल्यास माहिती समोर आलेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील मनुदेवी फाट्यावर असलेल्या हॉटेल रायबा येथे गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी प्रमोद श्रीराम बाविस्कर रा. पुनगाव, ता. यावल यांच्यावर दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी प्रमोद बाविस्कर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी त्यांच्या छातीत, तर दुसरी खांद्याला लागली. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
खाजगी रुग्णालयात ऑपरेशन सुरू
जखमी अवस्थेत प्रमोद बाविस्कर यांना तातडीने जळगाव येथील अरुश्री हॉस्पिटल येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी एक रिकामे काडतूस सापडले आहे. गोळीबारामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र पूर्व वैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत.













