Advertisement
आरोग्यजळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

मुख्यमंत्री सहायता निधी आरोग्य सेवा आता व्हॉट्सॲपवर मिळणार !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री सहायता निधी आजार व रक्कम अवलोकन समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी 5 डिसेंबर 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत 7,658 रुग्णांना 67.62 कोटींची मदत देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

मुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री सहायता निधीची सेवा नागरिकांसाठी अधिक सुलभ व्हावी यासाठी ती व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून द्यावी यासाठी मेटा कंपनीसोबत करार करण्यात आला आहे.तसेचसर्व आरोग्य योजनांसाठी एकत्रित पोर्टल तयार करून अर्जप्रक्रिया सुलभ करावी, मुख्यमंत्री सहायता निधी वाढवण्यासाठी औद्योगिक सामाजिक दायित्व (CSR) मध्ये समन्वयासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करावी, मुख्यमंत्री सहायता निधी योजनेत AI तंत्रज्ञानाचा वापर करावा, तालुकानिहाय रुग्णमित्र नेमावे, पॅनेलमध्ये अधिक रुग्णालयांचा समावेश करावा, जिओ टॅगिंगद्वारे रूग्णाला जवळच्या रुग्णालयांची माहिती द्यावी आणि टोल फ्री क्रमांक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टर उपस्थित होते.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button