
भुसावळ दि-02/05/2025, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने डिजीटल माध्यमातून जातीनिहाय जनगणना करण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. या ऐतिहासिक निर्णयाच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर व ग्रामीण तर्फे महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू पेढे खाऊ घालून तसेच फटाके फोडून जोरदार जल्लोषात या निर्णयाचे स्वागत केले आहे. यावेळी भाजपच्या र्यकर्त्यांनी केलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून निघाला.

दरम्यान, या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष प्रशांत पाटील, गोलू पाटील, किरण कोलते, संदीप सुरवाडे ,माजी शहराध्यक्ष युवराज लोणारी, व्यापारी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष मनोज बियाणी, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, बाजार समिती सभापती अनिल वारके, निळकंठ भारंबे, माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, ललित मराठी, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव प्रवीण इखनकर, भालचंद्र पाटील, सुनील महाजन, सदानंद उन्हाळे,पवन बुंदेले, श्रेयस इंगळे, जयंत माहुरकर, अनिता आंबेकर, मनीषा सैतवाल, रवी ढगे, शंकर शेळके, पुंडलिक पाटील,राहुल तायडे,अल्बर्ट तायडे, कुणाल येवले, लखन रणधीर, गोपीसिंह राजपूत, रवींद्र खरात, रहमान शेख, तुषार चिंधडे, मुकेश मोरे,नामदेव चौधरी,अनिल शेलार,भावेश चौधरी, धनराज बाविस्कर, मोहन पाटील, संजय भीरुड, पराग भोळे, भैय्या महाजन,अमोल महाजन, सागर चौधरी,नितीश इंगळे, जितेंद्र कोळी, रमाशंकर दुबे, शेखर धांडे, नरेंद्र पाटील, शैलेंद्र ठाकरे, दुर्गेश घुले आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.













