
भुसावळ दि-09/05/25, क्रांतीसुर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व समाज बांधव यांनी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जय जयकाराच्या जोरदार घोषणा दिल्या.
दरम्यान,या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे उत्तर शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, दक्षिण शहराध्यक्ष किरण कोलते, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रमोद नेमाडे, राजेंद्र नाटकर, अजय भोळे, सतीश सपकाळे, पिंटू ठाकूर, भैय्या महाजन, पुरुषोत्तम नारखेडे, गिरीश महाजन, बोधराज चौधरी, ललित मराठे, प्रवीण इखनकर, खुशाल जोशी, चेतन सावकारे,श्रेयस इंगळे, अनिरुद्ध कुलकर्णी, संग्राम सिंग पाटील, रमाशंकर दुबे, जयंत माहुरकर, वैशाली मराठे, शैलेजा पाटील, मीना राजपूत, सारिका राजपूत, नरेंद्र बऱ्हाटे ,गौरव आवटे ,कैलास शेलोडे, अल्बर्ट तायडे ,राहुल तायडे ,शेखर धांडे , रुपेश देशमुख, लखन रणधीर, अमोल पाटील, चेतन बोरोले, आकाश राजपूत, शुभम सिंग ठाकूर, रेहमान शेख, ऋषभसिंग राजपूत, दीपक भोळे, नरेंद्रसिंग ठाकूर, दिनेश सिंह, प्रथमेश कोलते,सागर चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे तसेच क्षत्रिय राजपूत नवयुवक मंडळाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.













