Advertisement
आरोग्यक्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक, रस्ता सुरक्षेच्या आणि दिपनगर प्रदूषणाच्या मुद्द्यांवर मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

दिपनगरच्या प्रदूषणावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश

जळगाव, दि-१३/०६/२५,
दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातून राख वाहून नेणाऱ्या बल्कर वाहनांमुळे सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडी आणि रस्ता सुरक्षेच्या प्रश्नावर आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे होते.
बैठकीत बल्कर वाहनांच्या अव्यवस्थित उभ्या राहण्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, नागरिकांना होणारा त्रास, तसेच संभाव्य अपघातांच्या पार्श्वभूमीवर चर्चा होऊन विविध उपाययोजनांचा निर्णय घेण्यात आला.


मुख्य निर्णय:

सर्व्हिस रोडवर बल्कर उभे करण्यास बंदी
राख वाहतुकीसाठी नियोजित वेळापत्रक तयार करणे
वाहतूक पोलिस व प्रकल्प सुरक्षा यांच्यात समन्वय
अपघात टाळण्यासाठी CCTV, संकेतचिन्हे आणि सुरक्षारक्षकांची नेमणूक

वस्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “रस्ता सुरक्षा आणि नागरिकांचा जीव वाचवणे हे प्राधान्याचं आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी यावर गंभीरपणे काम करावे.”
बैठकीस जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी, परिवहन विभागाचे अधिकारी आणि औष्णिक प्रकल्पाचे सुरक्षा अधिकारी उपस्थित होते.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button