Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

महापारेषण अधिकाऱ्यांनी एकाच कंपनीला काम देण्यासाठी नियमांना डावलले – अक्युरेट सेक्युरिटी सर्व्हिसेसची खंडपीठात याचिका दाखल


भुसावळ दि-२४/०६/२५, महापारेषण कंपनीसाठी सुरक्षा रक्षक पुरविण्याची निविदा ठाणे येथील रियल सेक्युरिटी सर्व्हिसेसलाच मिळावी, या हेतूने नियमांना डावलून संबधीत कंपनीला लाभ मिळावा, म्हणून खडका येथे महापारेषण विभागात कार्यरत अधीक्षक अभियंता  व व्यवस्थापकांनी मनमानी कारभार चालवला आहे, असा आरोप करुन पुणे येथील अक्युरेट सेक्युरिटी सर्व्हिसेसने उच्च न्यायलयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली आहे.
  रियल सेक्युरिटी सर्विसेस ठाणे ही कंपनी महापारेषणच्या खडका सर्कलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एकच काम करीत आहे. या कंपनीच्या व्यतिरिक्त इतर एजन्सीला हे काम मिळू नये, म्हणून महापारेषणचे उच्चपदस्थ अधिकारीही धडपड करीत आहेत. महापारेषणच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाने मंजूर केलेल्या सूक्ष्म  व लघु उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या  सवलतीमध्येही आडकाठी आणली असून सूक्ष्म व लघु उद्योगचे सनदी लेखापाल यांच्या प्रमाणपत्र, अनामत रक्कम सवलती व महापारेषांच्या परिपत्रकाच्या नियमाला अधिकाऱ्यांनीच डावलले असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याबाबत सेक्युरिटी सर्व्हिसेसने औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर खंडपीठाने निकाल देऊन निविदा रद्द करुन नव्याने निविदा काढावी असे आदेश केले. सदर आदेश दिल्यावर निविदा रद्द झाली. मात्र अधिकाऱ्यांनी सहा महिन्यांनी नवीन निविदा काढून कुभांड रचले. अक्युरेट सेक्युरिटी सर्व्हिसेसने यांनी पुन्हा निविदा भरली. ‘अनेक्चर- ए’ व ‘शेड्युल- सी’ हे भुसावळ खडका कार्यालय अधिक्षक अभियंता यांच्याकडे जमा करावयाचे होते, त्यानुसार अक्युरेट सेक्युरिटी सर्व्हिसेसचे वकील ॲड.प्रवीण सुरवाडे यांनी ते जमा केले आहे. तथापि अधीक्षक अभियंता यांनी अक्युरेट सेक्युरिटी सर्व्हिसेला अपात्र केलेले नाही. यासोबतच बदनामीकारक मजकूर लिहून अक्युरेट सेक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीला काळ्या यादी का टाकू नये असे ? अशा आशयाचे पत्र लिहून मनमानी केली. या प्रकरणीही अक्युरेट सेक्युरिटी सर्व्हिसेसने पुन्हा छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.या प्रकरणी ॲड.अमय सबनीस, ॲड.प्रविण सुरवाडे हे काम पाहत आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button