जळगावचे माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांची आत्महत्या, जिल्ह्यात मोठी खळबळ

जळगाव दि-01/08/25, माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या केल्याने जळगाव शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे.
या घटनेची माहिती मिळताच जळगाव शहरातील सर्वपक्षीय आजी-माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे.
बंटी जोशी हे जळगाव शहरातील उत्तम जाणकार आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जायचे. बंटी जोशी यांची विविध जनहितार्थ आंदोलने शहरात कायम चर्चेचा विषय ठरायची. जिल्हा रुग्णालयात बंटी जोशी यांच्या परिवारातील सदस्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकच आक्रोश केल्याचे ह्रदय पिळवून टाकणारे दृश्य बघून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले.
बंटी जोशी हे मागील काही दिवसांपासून राजकारणापासून अलिप्त होते. बंटी जोशी यांच्या या अशा अचानक जग सोडून जाण्यामुळे जळगाव शहरातील जनहितासाठी कायम लढणारा एक अभ्यासू कार्यकर्ता गमावल्याचे दुःख आता जळगावकरांना कायम वेदनादायी ठरणार आहे.













