Advertisement
राजकीय

जामनेर नगरपरिषद: भाजपच्या उमेदवार सौ. उज्वला दिपक तायडे बिनविरोध

भुसावळ – जिल्ह्यातील जामनेर नगरपरिषद निवडणूकीत प्रभाग क्रमांक 11 मधून महिला राखीव प्रवर्गातून उज्वला दिपक तायडे या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार विरोधी उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्रात तांत्रिक त्रुटी आढळून आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचा अर्ज बाद केलेला असल्याने, आणि या प्रभागात इतर उमेदवार शिल्लक नसल्याने मतदानाची प्रक्रिया पार पाडावी लागणार नाही. म्हणून सौ. उज्वला दिपक तायडे या भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या आहेत. दिपक तायडे हे माजी नगरसेवक असून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू स्वीय्य सहाय्यक आहेत.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button