
भुसावळ, दि. ३०/११/ २०२५ : भुसावळ नगरपालिकेची रणधुमाळी आता जोर पकडू लागलेली असून मतदारांसह उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ या मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार ममता अजयकुमार डागोर यांच्या महारॅलीमध्ये आज मेहतर वाल्मिकी समाजाने एकदिलाने व एकजूट होऊन सहभागी होऊन उमेदवार ममता अजयकुमार डागोर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे त्याचे आज दिसून आलेले आहे. वाल्मिकी मेहतर समाजासह सर्व समाजातील उपस्थित नागरिकांसह महिलांनी आज मिरवणुकीत दिलेल्या पाठबळामुळे ममता डागोर यांच्या प्रचाराला कमालीची ताकद मिळाली असून, त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडलेला आहे. त्यामुळे त्यांचा विजय आता शंभर टक्के निश्चित असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

“मी सर्वांगीण विकासाचे स्पष्ट व्हिजन घेऊन उतरले आहे. प्रचारादरम्यान घरोघरी मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि प्रेम पाहता विजय आमचाच आहे,” असे ममता अजय डागोर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, प्रभागात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले समाजसेवक अजय कुमार डागोर यांच्या जनहिताच्या सातत्यपूर्ण कामामुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसत असून त्यांचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी व्यक्त केलेला आहे. आजच्या भव्य मिरवणुकीत जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे हे सहभागी झाल्याने त्यांनी मतदारांना केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाल्यामुळे प्रचाराला आणखी भक्कम बळ मिळालेले आहे.













