उद्या मुंबई,ठाणे पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट,पर्यटनाला न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन
मुंबई दि-24 संपूर्ण राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती आहे. अशातच हवामान विभागान उद्या दिनांक 25 जुलै रोजी अनेक भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 26 जुलैपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडणारच आहे.
उद्या मुंबई, ठाणे,पुण्यात ऑरेंज अलर्ट
उद्या मुंबईसह ठाणे आणि पुण्यातही मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या राज्यातील आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यानुसार मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस उद्या पडू शकतो.त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे.