Advertisement
जळगावमहाराष्ट्रमुंबई

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन अपर जिल्हाधिकारी यांची नियुक्ती; शासन आदेश जारी

जळगाव, दि. २६ सप्टेंबर २०२५: महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या तरतुदींनुसार जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या अपर जिल्हाधिकारी पदावर श्री. श्रीमंत चांगदेव हारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती सार्वजनिक सेवेच्या हितार्थ आणि प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने करण्यात आली असून, यामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज अधिक सुसंबद्ध होण्याची अपेक्षा आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार (संदर्भ क्र. २), अपर जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गास विभागीय संवर्ग वाटप नियम, २०२१ लागू होत नाहीत. त्यानुसार, २००५ च्या अधिनियमाच्या कलम ४(४) आणि ४(५) नुसार ही पदस्थापना करण्यात आली. श्री. हारकर यांची ही नियुक्ती जळगाव जिल्ह्यातील विकासकामे आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
यापूर्वी श्री. हारकर हे कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात सह आयुक्त (रोहयो) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे जळगाव जिल्ह्यातील विविध विभागीय योजना, महसूल व्यवस्था आणि नागरी सेवांमध्ये सकारात्मक बदल अपेक्षित आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील हे पद रिक्त असल्याने अनेक महत्त्वाचे निर्णय आणि कामे रखडली होती, जी आता वेगवान होण्याची शक्यता आहे.

याचं आठवड्यात वैशाली चव्हाण यांची जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी (Resident Deputy Collector) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.त्यानंतर आज अप्पर जिल्हाधिकारी यांची नियुक्ती आदेश काढल्याने शासनाने आता जळगाव जिल्ह्यातील प्रशासनाकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button