Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्र

मुक्ताईनगरात भरधाव डंपरने उडवले, तिघांचा जागीच मृत्यू, डंपरचालक फरार ,जमावाचा उद्रेक

मुक्ताईनगर, जळगाव येथे इंदूर-हैदराबाद महामार्गावर 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी झालेल्या भीषण अपघातात भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. BNA Infrastructure कंपनीच्या डंपरने ही धडक दिल्याची माहिती समोर आली असून, कंपनीच्या बेफिकीर कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
प्रत्यक्षदर्शींनुसार, अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरून तिघेही रस्त्यावर फेकले गेले.आणी त्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. स्थानिकांनी तातडीने मदत केली, पण तिघांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून, ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. डंपरचालक फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.पोलिसांनी अतिवेग आणि बेफिकीर वाहनचालन हे अपघाताचे संभाव्य कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने या महामार्गावरील कामांबाबत सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button