Advertisement
अर्थकारणक्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्र

भुसावळातील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पतसंस्थेत ९.९० कोटींच्या बोगस कर्ज प्रकरणात ८ माजी संचालकांसह १६ जणांना अटक

आणखी एका प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल

भुसावळ दि 29-07-2025, भुसावळ शहरातील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पतपेढीत ९.९० कोटींच्या बोगस कर्ज वाटप प्रकरणात तत्कालीन ८ संचालकांसह १६ जणांना अटक करण्यात आल्याने पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्रासह सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी नुतन सभापती प्रदिप सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी संस्थेत यापूर्वी बोगस पद्धतीने मंजूर करण्यात आलेल्या बोगस कर्ज प्रकरणांची माहिती घेऊन त्याबाबत संचालक मंडळाची बैठक घेऊन १ कोटी ९३ लाखांच्या वर बोगस पद्धतीने RTGS रक्कम वर्ग झाल्याप्रकरणी पत्रकार परिषदेत मागील संचालक मंडळावर आरोप करून पोलिसात तक्रार दिलेली आहे.मात्र याप्रकरणी अजून तपास सुरू असून गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत.
त्यानंतर आता हा काही वर्षांपूर्वी झालेल्या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करून संबंधित सर्व जबाबदार माजी संचालक व कर्मचारी यांना तपासाअंती संशयित ठरवून गुन्हे दाखल करून ताब्यात घेतलेले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ शहरातील प्राथमिक शिक्षकांची नूतन सहकारी पतपेढी या पतसंस्थेतील संचालकांनी बनावट  कर्ज वाटप करून ९.९० कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शासकीय लेखापाल यांच्या अहवालात समोर आले. शासकीय लेखापाल प्रकाश चौधरी यांनी सोमवारी याबाबत पोलिसात तक्रार दिली. त्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवले. आर्थिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी पथकासह भुसावळ येथे जाऊन सोमवारी दिवसभरात पतपेढीचे आठ माजी सभापती, संचालक व पतसंस्थेचे आठ कर्मचारी ज्यात व्यवस्थापक, कॅशियर, लिपिक, शिपाई अशांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून अटक करून जळगाव शहर पोलिस ठाण्यातील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
अटक केलेल्या आरोपींची नावे
१) गंगाराम सिताराम फेगडे (जळगाव)
२)हरिश्चंद्र काशीनाथ बोंडे (सावदा)
३)राजू लालू गायकवाड (भुसावळ)
४)हितेश संजय नेहेते (भुसावळ)
५)रमेश चिंधू गाजरे (फैजपूर)
६)कृष्णा गजमल सटाले (जामनेर)
७)मधूकर श्रीकृष्ण लहासे (पहूर)
८)सुरेश गंगाराम इंगळे (खिरोदा)
९)कैलास पंडित तायडे (जळगाव)
१०)पंकज मोतीराम ढाके (भुसावळ)
११)संजय तुळशीराम चौधरी (जामनेर)
१२)अझरुद्दीन राजेंद तडवी (फैजपूर)
१३)राहुल लक्ष्मीकांत चौधरी (भुसावळ)
१४)जितेंद्र सुधाकर फेगडे (भुसावळ)
१५)राजेश देविदास लहासे (फैजपूर)
१६)हितेंद्र अमोल वाघुळदे (फैजपूर)

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button