Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्र

भुसावळ पोलिस उपअधीक्षकपदी केदार बारबोले यांची नियुक्ती, डॅशिंग अधिकाऱ्याच्या नियुक्तीने खळबळ

संदिप गावीत यांची पदोन्नती

भुसावळ, दि. २२ डिसेंबर २०२५ : भुसावळ उपविभागाच्या पोलिस उपअधीक्षकपदी नागपूर शहरातील सहाय्यक पोलिस आयुक्त केदार प्रकाश बारबोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. कार्यासन अधिकारी मृणाल कृष्णा सावंत यांनी बदलीचे निर्देश दिले आहेत.
मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असलेले श्री केदार बारबोले यांनी यापूर्वी २०२४ मध्ये जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलिस ठाण्यात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून काम केले असल्याने त्यांना जळगाव जिल्ह्याची चांगली माहिती आहे. 2023 च्या राज्य सेवा बॅचचे राज्यभरातून सहाव्या क्रमांकाने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले, शांत स्वभावाचे आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे भुसावळ विभागातील कायदा व सुव्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
दरम्यान, सध्याचे पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांची अपर पोलिस अधीक्षक किंवा सहाय्यक पोलिस अधीक्षकपदी पदोन्नतीसह बदली होण्याची शक्यता आहे. त्यांच्या बदलीचे आदेश येत्या दोन दिवसांत जारी होण्याची अपेक्षा आहे. गावीत यांनी यंदा ३१ जुलै २०२५ रोजी भुसावळमध्ये पदभार स्वीकारला होता. त्यांच्या आधी कृष्णात पिंगळे यांची पुणे अमली पदार्थ विरोधी विभागात बढतीसह बदली झाली होती. या नियुक्तीमुळे भुसावळ पोलिस दलात नवीन दबंग अधिकारी आल्याचे बोलले जात आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Join WhatsApp