Advertisement
महाराष्ट्रमुंबईराजकीय

राज्य विधानसभा निवडणुकीची अधिसूचना, राजपत्राच्या प्रती राज्यपालांना सादर

राष्ट्रपती राजवटीचे सावट निवळले

मुंबई दि-24/11/24, भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची रविवारी (दि. २४) राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना – निवडून आलेल्या सदस्यांची यादी – व राजपत्राची प्रत सादर केली.

महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांचे निकाल दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहिर करण्यात आले. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम ७३ मधील तरतूदीनुसार, या निवडणूकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची नावे, भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक २४ नोव्हेंबर, २०२४ च्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली.

सदर राजपत्र व अधिसूचनेच्या प्रती निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आज राज्यपालांना सादर केल्या.

यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास व कक्ष अधिकारी निरंजन कुमार शर्मा हे देखील उपस्थित होते.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Join WhatsApp