Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

भुसावळ बाजारपेठ हद्दीत इंडिया-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा चालवणाऱ्या दोघांवर LCB ची कारवाई; १.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त

भुसावळातील सट्टा आता LCB च्या रडारवर

जळगाव, दि. २२ सप्टेंबर २०२५: स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी गोपनीय माहितीच्या आधारे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत इंडिया-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा (बेटिंग) चालवणाऱ्या दोन इसमांवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत १,०५,०००/- रुपये किंमतीचा सट्ट्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल आणि त्यांच्या पथकाला गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, भुसावळ येथील सिंधी कॉलनीतील नवजीवन सोसायटीत राहणारा प्रकाश हुंदामल सारडा हा त्याच्या घरी इंडिया-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा चालवत आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचांसह छापा टाकला.
या कारवाईदरम्यान प्रकाश हुंदामल सारडा (वय ५५, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) आणि रणजीत चत्रभान हंडी (वय ३५, रा. गणपती नगर, जळगाव) हे दोघे ऑनलाइन सट्टा खेळवताना आढळून आले. त्यांच्याकडून १,०५,०००/- रुपये किंमतीचे सट्ट्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या दोघांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे सीसीटीएनएस क्रमांक ४५८/२०२५ अंतर्गत महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम ४ व ५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, रवि नरवाडे, पोलीस हवालदार उमाकांत पाटील, विकास सातदिवे, राहुल वानखेडे, प्रशांत परदेशी, महिला पोलीस हवालदार दर्शना पाटील आणि चालक पोलीस हवालदार भरत पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली.
स्थानिक गुन्हे शाखेची भुसावळ शहरातील ही कारवाई अवैध सट्टेबाजांविरुद्ध कठोर पावले उचलण्याच्या दिशेने प्रथमच ठोस महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button