Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

जळगावचे मुख्य आरटीओ ‘इतक्या’ लाखांची लाच घेताना अडकले, जिल्ह्यात मोठा भूकंप

जळगाव दि-05/12/2024, बदली केल्याच्या पार्श्वभूमीवर आरटीओ निरीक्षकाच्या कडून तीन लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी जळगाव जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह एका खासगी इसमास छत्रपती संभाजी नगर विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने  ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडालेली आहे.
या घटनेत आरटीओ कर्मचारी असलेल्या तक्रारदार निरीक्षकाची नवापूर येथे बदली करण्यात आली होती.
या बदली करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी भावे  नावाच्या खासगी इसमाच्या माध्यमातून   तक्रारदार यांच्या कडे तीन लाखांच्या लाचेची मागणी केली होती.
याबाबतची माहिती तक्रारदार अधिकाऱ्याने छत्रपती संभाजी नगर विभागीय लाचलुचपत विभागाला कळविलेली होती. लाचलुचपत विभागाने लावलेल्या सापळ्याप्रमाणे तक्रारदार यांनी खासगी इसम भावे यांच्याकडे ही रक्कम देत असताना, रंगेहाथ पकडण्यात आले तर प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. प्रादेशिक अधिकारी दिपक पाटील यांच्या कोल्हापूर,ठाणे, सांगली ,नगर येथील घरांची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. यात अनेक बेनामी संपत्तीसह मोठे घबाड सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यामुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडालेली आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp