Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

जळगाव शहरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना नोटांसह अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


जळगाव दि२९/०६/२५, जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या जिल्हा रूग्णालय परिसरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रकार उघडकीस आला असून यामुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडालेली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्थानिक गुन्हे शाखेच्या जळगाव उपविभागातील पथकास आज रोजी पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहितीनुसार, जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात दोन इसम  बनावट नोटा घेऊन येणार आहेत. त्या अनुषंगाने मिळालेल्या गुप्त माहिती वरून आणि वर्णनानुसार दोन संशयित इसम हिरो कंपनीची मोटरसायकल क्रमांक MH19 DU7808 यावर येताना दिसले त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थांबण्याचा इशारा करून थांबविले असता, त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव अनुक्रमे सचिन संजय गोसावी रा. रुक्मिणी नगर वाघ नगर रिक्षा स्टॉप जवळ जळगाव आणि सचिन दरबार सिंग राजपूत  रा. रामेश्वर कॉलनी, गजानन महाराज मंदिरासमोर ,जळगाव असल्याचे सांगितले. नमूद इसमाची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता संशयित इसम सचिन संजय गोसावी याच्याकडे 3,000/- रुपये किमतीच्या 500/- दराच्या 6 बनावट नोटा व संशयित इसम सचिन दरबारसिंग राजपूत वय 34 वर्ष याच्याकडे 3,000/- रुपये किमतीच्या 500/- दराच्या 6 बनावट नोटा मिळून आलेल्या आहेत.असे एकूण 6,000/- रुपये किमतीचे 500/- रुपये दराच्या म्हणून त्यांच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक  166/2025 BNS कलम 180, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री संदीप पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली Psi शरद बागल यांचेसह पोलिस कॉन्स्टेबल नितीन पाटील, नितीन बाविस्कर ,अक्रम शेख ,प्रवीण भालेराव ,किशोर पाटील ,रवी कापडणे यांनी केली आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button