पुण्यात पोलिसाची पोलीस स्टेशन मध्येच ४ गोळ्या झाडून आत्महत्या, पोलीस दलात खळबळ
पुणे – येथील खडकी परीसरात असलेल्या लोहिया नगर पोलीस ठाण्यात भारत दत्ता आस्मर हे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे रात्रपाळीसाठी ते कामावर आले होते. त्यांची नेमणूक असलेल्या लोहिया नगर पोलीस चौकीत गेले. रात्री आपली बंदूक सोबत घेऊन वरती असणाऱ्या रेस्ट रूममध्ये आरामासाठी गेले होते. मात्र अचानक गोळीबार झाल्याचा आवाज आला आणि इतर सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांची काय झाले म्हणून पाहणी केली असता, त्यांनी स्वत:वर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेत त्यांचा जागेवरच मृत्यू झालेला आहे.
दहा वर्षांपूर्वी पोलीस दलात
भारत दत्ता आस्मर मागील काही दिवसांपासून तणावात होते. परंतु त्यासंदर्भात ते कोणाकडे काही बोलले नव्हते. त्यांच्या तणावाचे कारण समोर आलेलं नाही. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली असून या घटनेची आता विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.