लोकशाही दिन साजरा न केल्याने भुसावळ तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी – केदारनाथ सानप
भुसावळ दि-16/09/2024 भुसावळ येथील शासकिय कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या तिसर्या सोमवारी लोकशाही दिन साजरा करण्याचे शासकीय आदेश आहे. मात्र मागील वर्षापासून तहसील कार्यालयातील अधिकार्यांना या लोकशाही दिनाचा विसर पडलेला आहे. याबाबत येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तक्रार अर्ज लेखी स्वरूपात दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भुसावळ येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी दि. 16/09/2024 रोजी लोकशाही दिनात तक्रार घेवून गेले असता संबंधित तहसीलदार तेथे हजर होते. मात्र कोणत्याही विभागाचे अधिकारी त्यांच्या दालनात उपस्थित नव्हते. यामुळे केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार अर्ज दाखल केला आहे. मागील वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयातून पत्र क्र. लोकशाही दिन/कावि/264/2023 दि.6/9/2023 असे तहसीलदार यांना दि.18/09/2023 रोजी लोकशाही दिन साजरा करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यावेळीही लोकशाही दिनाचा विसर अधिकार्यांना पडला होता. यावर्षी देखील लोकशाही दिनाचा अधिकार्यांना विसर पडला. याबाबत येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तक्रारी अर्ज लेखी स्वरूपात दाखल केला आहे. तरी जिल्हाधिकारी यांच्याकडून संबंधित अधिकार्यांवर काय कारवाई होते याकडे आता भुसावळ तालुक्यातील सर्व जनतेचे लक्ष लागून आहे.