पोकर किंवा रम्मी सारख्या मनोरंजक गेमिंग क्रियाकलाप हे बुद्धी कौशल्याचे खेळ आहेत, जुगार नाही: अलाहाबाद हायकोर्ट
अलाहाबाद उच्च न्यायालयाने काल एका महत्वपूर्ण निकाल देताना पुनरुच्चार केला आहे की , पोकर आणि रम्मी (Rummy ) हा पूर्णपणे बुद्धीकौशल्याचा खेळ आहे तो जुगार नाही. आग्रा, पोलीस उपायुक्त शहर आयुक्तालयाच्या कार्यालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती, ज्याद्वारे रमी आणि पोकरसाठी गेमिंग युनिट स्थापन करण्यास पोलिसांकडून परवानगी नाकारली गेली होती.
न्यायमूर्ती शेखर बी. सराफ आणि न्यायमूर्ती मंजीव शुक्ला यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने पोकर आणि रम्मी हे पत्त्यांचे खेळ असून ते जुगार नसून बुद्धीकौशल्याचे खेळ आहेत या मुद्द्यावर जोर देत जाता परवानगी देण्याचे आदेश पोलिस उपायुक्त यांना दिलेले आहेत.
पोकर आणि रम्मी हे बुद्धीकौशल्याचे खेळ असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयाच्या निकालांकडे संबंधित अधिकाऱ्याने लक्ष दिले पाहिजे, असे निरीक्षण नोंदवून अलाहाबाद उच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, केवळ संबंधित अधिकाऱ्याच्या दावेदारीच्या आधारे परवानगी नाकारणे हे टिकून राहण्याचे कारण असू शकत नाही. मनोरंजक गेमिंग क्रियाकलाप पार पाडण्यासाठी परवानगी नाकारण्यासाठी अधिकाऱ्याने गुन्हा घडण्यासाठी आवश्यक तथ्ये आणि खेळणाऱ्यांचा हेतू रेकॉर्डवर आणणे आवश्यक आहे.