सुप्रिया सुळेंचा मोबाईल फोन आणि व्हाट्सअँप हॅक, मोबाईल हॅकिंगमुळे राज्यात पुन्हा मोठी खळबळ
मुंबई ,दिनांक:11/08/2024, एक मोठी खळबळजनक बातमी समोर आलेली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल फोन आणि व्हाँट्सअँप हॅक करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी त्याच्या ‘X’ अकाउंटच्या माध्यमातून ट्विट करून जाहीर केल्याने राज्यात मोठी खळबळ उडालेली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक करण्यात आला असून, त्यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की, ‘अत्यंत महत्वाचे माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी.’
‘पेगासस’ व्हायरस पुन्हा चर्चेत ?
गेल्या काही वर्षांपूर्वी विदेशी पत्रकारांनी केलेल्या दाव्यानुसार इस्रायली तंत्रज्ञानाने विकसित झालेल्या आणि फक्त एखाद्या देशाच्या सरकारलाच विक्री करता येणारा ‘पेगासस’ व्हायरस भारतातील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या आणि काही पत्रकारांच्या मोबाईल मध्ये स्थापित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी संसदेमध्ये खूप मोठा गदारोळ होऊन यावर प्रसारमाध्यमांमध्ये अनेक दिवस चर्चा देखील झाली होती. त्याच्यानंतर आज झालेली घटना ही खूप मोठ्या धोक्याच्या इशाराकडे लक्ष वेधत असल्याची माहिती समोर आलेली आहे. कारण राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या संसदेत सत्ताधारी पक्षांना विविध विषयावर नेहमी अभ्यासपूर्ण आणि महत्वपूर्ण प्रश्न विचारत असतात. आणि अशातच त्यांचा मोबाईल आणि व्हाट्सअँप हॅक होणे ही खूप मोठे घटना मानली जात आहे. तंत्रज्ञानाचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच तोटे देखील आहेत.हे आता अधोरेखित होताना दिसून येत आहे. तंत्रज्ञानामुळे आपली कामं सोपी झाली. क्षणारार्धात कोणाशीही कधीही मोबईद्वारे आपल्याला सहज संपर्क साधता येतो. मात्र आता याचा तोटा म्हणजे मोबाईल हॅकिंगचा धोका देखील वाढला आहे. अनेकांना हॅकिंगचा फटका बसतो. मोबाईल हॅक केले जातात. कित्येकदा आपल्या मोबाईलमध्ये असलेली महत्त्वाची गोपनीय माहिती आपला मोबाईल हॅक करून हॅकर काढू देखील शकतात. त्यामुळे आता मोबाईल हॅकिंग चा गंभीर विषय पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे .आता या प्रकरणात नेमकी पुढे काय चौकशी होते ? आणि काय घडामोडी घडतात याकडे राज्याचे लक्ष लागून आहेत.