सुरतचे दोन कुख्यात ‘सुपारी किलर’ स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात, गुजरात के ग्यारा मुल्खो की पुलीस ईन्हे धुंड रही थी !!
जळगाव ,दिनांक -28 जून, गुजरात मधील सुरत शहरात गेल्या काही वर्षात सुपारी घेऊन तब्बल ५ वेगवेगळ्या व्यक्तींच्या हत्या करणारे दोन सराईत गुन्हेगारांना जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीवर संशयितरीत्या फिरत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केलेली आहे. सुरत शहरातील उमरपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीचा खून करून जळगाव जिल्ह्यात पसार झाल्याची माहिती खबऱ्याद्वारे स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेली होती. या संशयित गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सुरत पोलीस गेल्या काही दिवसांपासून अहोरात्र प्रयत्न करत होते. दिनांक 27/0 6/2024 रोजी संशयीत दोन्ही आरोपी हे अजिंठा चौफुली येथे ट्रकला हात देऊन कुठेतरी निघून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबनराव आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तयार करून मोठ्या शिताफीने त्यांना अजिंठा चौफुली येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यांना पोलीस खात्यावर दाखविल्यानंतर त्यांनी सुरत येथील एमआयएमचे खुर्शीद अली सय्यद यांनी सोळा लाख रुपयांची सुपारी देऊन अनुक्रमे 1) बिलाल चांदी आणि 2) अज्जू या दोन व्यक्तींचा गळा कापून त्यांना जीवे ठार मारल्याची कबुली दिलेली आहे.
अफजल अब्दुल शेख (वय 38) रा.उमरपाडा मशीद जवळ ,सुरत तर प्रज्ञेश दिलीप गामीत (वय 26) असे या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सुपारी किलर गुन्हेगारांची नावे आहेत. यातील आरोपी क्रमांक 1) अफजल शेख याचेवर यापूर्वी सुपारी घेऊन पाच खून केल्याचे गुन्हे दाखल आहेत. तर प्रज्ञेश गामीत रा. तरकुवा डोंगरी ता.व्यारा जि.वापी यांचे विरोधात तब्बल 15 गुन्हे दाखल आहेत. या दोघा आरोपांच्या शोधा करिता गुजरात पोलिसांनी तब्बल 11 पथके तयार केलेली होती. सदर दोन्ही आरोपींना पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या पथकास यश आलेलं आहे. सदर गुन्ह्याची कारवाई डॉ महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव ,अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव, संदीप गावित उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.