क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

65 कोटींची बोगस बिले दाखवून शासनाची फसवणूक,जळगावात जीएसटी विभागाची मोठी कारवाई

जळगाव, दि-०१ ऑगस्ट २०२४, खोटी बिले देऊन अथवा घेऊन शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या जळगाव शहरातील मे. स्वामी ट्रेडिंगचे कंपनीचे मालक नामदेव दौलत धनगर रा. सुटकार ता. चोपडा यांना आज जळगाव वस्तू व सेवा कर विभागाच्या अन्वेषण विभागाने करचुकवेगिरी केल्याने अटक केली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे. संशयित आरोपी नामदेव धनगर यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मालाची विक्री न करता बनावट बिले देऊन बनावट करवजाटीचा पुरवठा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
    याबाबत सविस्तर वृत्त असे की, मे स्वामी ट्रेडिंग कंपनीचे मालक नामदेव दौलत धनगर यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मालाची विक्री न करता तब्बल 65 कोटींची खोटी बिले देऊन शासनाची 12.65 कोटी रुपयांचा महसूली कर बुडविल्याचे उघडकीस आले आहे. या करदात्याने महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम कायदा 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन केले असल्यामुळे नामदेव दौलत धनगर यांना महाराष्ट्र वस्तु व सेवा कर विभागाच्या जळगाव कार्यालयातील अन्वेषण शाखेमार्फत करचुकवेगिरीसाठी आज दिनांक 01/08/ 2024 रोजी करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जळगाव, यांच्या कोर्टात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 14 दिवसांपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर अटक कार्यवाही ही श्री सुभाष परशुराम भवर (राज्यकर सहआयुक्त जळगाव) यांचे मार्गदर्शनाखाली श्री सूर्यकांत कुमावत (राज्यकर उपायुक्त) अन्वेषण शाखा जळगाव,यांच्या नेतृत्व श्री माहुल इंदाणी (सहाय्यक राज्यकर आयुक्त) अन्वेषण शाखा जळगाव, रामलाल पाटील (सहाय्यक राज्यकर आयुक्त) अन्वेषण शाखा जळगाव, यांचे मार्फत अंमलात आली. सदर पथकात राज्यकर निरीक्षक श्री प्रशांत रौंदळ, संदीप पाटील ,योगेश कानडे, स्वप्निल पाटील, दीपक पाटील, सिद्धार्थ मोरे, श्रीमती संध्या वाकडे ,श्वेता बागुल व कर सहाय्यक रमेश इंगळे यांचा समावेश होता. सदर अटकेची कार्यवाही श्री सुभाष उमाजी इंगळे (अप्पर राज्यकर आयुक्त) नाशिक क्षेत्र, नाशिक यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.सदर प्रकरणामध्ये पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील इतर संबंधितांवर आणि लेखा परिक्षक यांचेवरही लवकरात लवकर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागात यावर्षी या आर्थिक वर्षातील ही सातवी अटक केलेली असून ही विभागाने खोट्या कर वजाबाकीचा दावा करणाऱ्या व खोटी बिले देऊन शासनाची कर चुकवेगिरी करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील करदात्यांना या धडक कारवाईमुळे गंभीर इशारा दिलेला आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button