अमेरिकेत बनले जगातले दुसरे सर्वात मोठे मंदिर,183 एकरवर पसरलेल्या या मंदिरात 10 हजार मुर्त्या,बघा ही भव्यता
नवी दिल्ली | 26 सप्टेंबर 2023 : अमेरिकेतील न्यूजर्सी येथे एका भव्य हिंदू मंदिराचे निर्माण पूर्ण होत आलेलं असून हे जगातले दुसरे मोठे मंदिर आहे. या मंदिराचा पसारा 183 एकर पसरला असून त्याच्या निर्मितीसाठी 14 वर्षांचा काळ लागला आहे. या मंदिराचे उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी होत आहे. न्यूयॉर्क स्थित टाईम्स स्वेअरपासून 60 मैल दक्षिणेल आणि वॉशिग्टन डीसी पासून सुमारे 180 मैल उत्तरेला रॉबिन्सविले टाऊनशिपमध्ये बीएपीएस स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराची निर्मिती 2011 रोजी सुरु झाली होती. यासाठी 12,500 स्वयंसेवकांनी मदत केली.
या अक्षरधाम मंदिराचे क्षेत्र 183 एकरात पसरले आहे. या मंदिरात हिंदू धर्मग्रंथाच्यानूसार 10,000 मूर्ती, भारतीय वाद्ये आणि नृत्यांगणाची नक्षी आणि भारतीय संस्कृती दिसणार आहे. हे मंदिर कंबोडीयातील अंकोरवाट मंदिरानंतरचे दुसरे मंदिर आहे. कंबोडीयातील मंदिर 12 व्या शतकातील असून जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. हे मंदिर 500 एकरात पसरलेले आहे. हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे.
नवी दिल्लीतील अक्षरधाम 100 एकराचे
नवी दिल्लीतील अक्षरधाम मंदिर 100 एकरावर पसरले आहे. ते साल 2005 पासून सर्वसामान्यांसाठी उघडले. बीएपीएस स्वामी नारायण संस्थेचे अक्षरवत्सलदास स्वामी यांनी आमच्या आध्यात्मिक गुरुंनी पश्चिमेकडेही एका भव्य मंदिराची गरज होती. जे केवळ हिंदू, भारतीयच नव्हे तर जगातील सर्व लोकांना खुले असावे. येथे येऊन लोकांना हिंदू परंपरा, संस्कृतीचे दर्शन व्हावे असे विचार व्यक्त केले होते. आमच्या प्रमुख स्वामी महाराज्या इच्छेनुरुप बांधलेल्या या मंदिराचे औपचारिक उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि 18 ऑक्टोबर रोजी ते सर्वसाधारण भक्तांसाठी खुले होणार आहे.