Advertisement
आरोग्यजळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

जळगावात राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांचा दौरा,उद्या विविध बैठका व आढावा कार्यक्रम

जळगाव, दि. ३० ऑक्टोबर २०२५ : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) मा. श्री. शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या शुक्रवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्याकडून प्रसिद्ध झालेल्या कार्यक्रम पत्रकानुसार त्यांचा दिवसाचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सकाळी ११.०० ते १२.००
सर्व स्थानिक सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी भेटीची राखीव वेळ

दुपारी १२.०० ते १.००

  1. मा. आयुक्त, जळगाव महानगरपालिका
  2. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, जळगाव
  3. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय
  4. शिक्षणाधिकारी (प्रा. व मा.), जिल्हा परिषद
  5. तसेच सर्व नगरपरिषद, नगरपंचायत प्रतिनिधी

दुपारी ३.०० ते ४.००
आयुक्त, महानगरपालिका जळगाव यांच्या समवेत “National Action for Mechanized Sanitation Ecosystem (NAMASTE)” योजनेचा आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी जळगाव जिल्ह्यातील अम्बलबजावणी, तसेच उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे प्रलंबित याचिका क्रमांक ३९५०/२०२३ व १५४३४/२०२३ मधील निर्देशानुसार करण्यात आलेली कार्यवाही लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार प्रलंबित प्रकरणे व त्याबाबत करण्यात आलेली कार्यवाही सफाई कर्मचाऱ्यांच्या दुर्घटनाग्रस्त प्रकरणांवर आणि त्यांच्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांवरही सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे.

सायंकाळी ४.०० ते ५.००
जळगाव येथील सफाई कर्मचारी संघटनांच्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या वस्त्यांमध्ये जाऊन भेट देण्यात येणार आहे.

सायंकाळी ५.०० नंतर
मुंबईकडे प्रयाण.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button