Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

दोन चोरीच्या बुलेटसह एकास अटक, जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव,दि-19/04/2025,  जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस  ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दि-१७/०४/२५ ,  मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अजिंठा चौफुली जळगाव येथे छत्रपती संभाजी नगर मधील एक तरुण महागडी बुलेट चोरी करुन स्वस्तात विक्री करण्यासाठी अजिंठा चौफुली येथे आलेला आहे. अशा बातमीवरुन गुन्हे शोधपथकातील पोउपनि चंद्रकांत धनके, पोहेका गणेश शिरसाळे, पोका. गणेश ठाकरे, राहुल रगडे, विशाल कोळी, योगेश बारी यांना बातमीची खात्री करणेकामी अजिंठा चौफुली येथे रवाना केले. सदर पथक हे अजिंठा चौफुली जळगाव येथे गेले असता मिळालेल्या बातमीप्रमाणे एक तरुण  हा लाल रंगाच्या विना नंबर प्लेटच्या बुलेट सह दिसुन आला. त्यास सदर पथकाने पळुन जाण्याची संधी न देता शिताफिने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नांव गाव विचारता त्याने त्याचे नांव साजीद खान शकिल खान रा. छत्रपती संभाजी नगर असे असल्याचे सांगीतले. त्याच्याजवळ मिळुन आलेल्या बुलेट चे कागदपत्रांची मागणी केली असता त्याच्याजवळ कोणतेही कागदपत्र नसल्याने सदर बुलेटचे चेसीस नंबर ची ऑनलाईन पाहणी केली असता सदरची बुलेट ही पुणे येथील असल्याचे दिसुन आल्याने सदर ईसमास ताब्यात घेवुन त्याने एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील मोटार सायकल चोरी केली असावी, या संशयावरुन गुन्हा रजि नंबर 255 / 2025 बीनएसएस कलम 303 (2) यात अटक करण्यात आली होती. पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान सदर संशयिताने अजुन एक YEZDI ROADSTER बुलेट अशी महागडी गाडी काढुन दिली आहे. अशा प्रकारे सदर इसमाकडुन 2,50,000/- रुपये किंमतीच्या दोन महागडया बुलेट हस्तगत केल्या असुन, त्याबाबत चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर आणी सातारा पोलीस स्टेशन छत्रपती संभाजी नगर येथे मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. संबधीत पोलीस स्टेशनला आरोपी हस्तांतरीत करणेबाबत कळविण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली वर नमूद गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.सदर गुन्हयाचा तपास पोहेका गणेश शिरसाळे हे करीत आहेत.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Join WhatsApp