Advertisement
क्राईम/कोर्टजळगावराजकीय

भुसावळ तालुक्यातील कन्हाळा येथील पोलिस पाटील 16 जूनपासून बेपत्ता; अवैध हातभट्टी दारूविरोधातील कारवाईनंतर कन्हाळा गाव पुन्हा चर्चेत

पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष बेपत्ता झाल्याने खळबळ

भुसावळ | प्रतिनिधी : भुसावळ तालुक्यातील कन्हाळा (बु.) गावचे पोलिस पाटील रेवसिंग भाऊराव पाटील हे दिनांक 16 जून 2026 रोजी सकाळी घरातून बाहेर पडल्यापासून बेपत्ता झाले असून, याबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ते भुसावळ तालुका पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष सुद्धा असल्याची माहिती समोर आली आहे.
भुसावळ तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेवसिंग पाटील हे 16 जून रोजी सकाळी घरातून निघून गेले. विशेष म्हणजे त्यांचा मोबाईल फोन आणि मोटारसायकल घरीच असल्याने त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.
घरातून बाहेर पडताना त्यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच दिवशी सकाळी सुमारे 6.30 वाजता नाहाटा चौक परिसरातून एमएच-14-8924 क्रमांकाच्या बसमध्ये प्रवास करताना ते दिसून आले होते. संबंधित बस भुसावळहून मुंबईमार्गे जात असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी रेवसिंग पाटील यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत कन्हाळा गाव परिसरातील अवैध हातभट्टी दारू निर्मितीच्या ठिकाणांवर धडाकेबाज कारवाई करण्यात महत्त्वाची मदत केली होती. त्यामुळे त्यांच्या अचानक बेपत्ता होण्याच्या घटनेने विविध चर्चांना उधाण आले असून, या प्रकरणाची सर्वंकष चौकशी करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
रेवसिंग पाटील यांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा तसेच नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून प्रयत्न सुरू आहेत. संबंधित व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पवन पाटील – 9834652008
सचिन चौधरी – 8329012413
शुभम कांबळे – 9545103510
गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांविरोधात सक्रिय भूमिका बजावणारे पोलिस पाटील अचानक बेपत्ता झाल्याने या घटनेची गंभीर दखल घेऊन सखोल तपास करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, कोणतीही विश्वसनीय माहिती उपलब्ध झाल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp