Advertisement
जळगावनिवडणूकराजकीय

भुसावळात प्र क्र 9 मधील उमेदवार युवराज लोणारी व वसंत पुनम पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे रजनी सावकारेंच्या हस्ते उद्घाटन

भुसावळ – नगरपरिषदेची निवडणूक आता रंगतदार वळणावर आलेली असून प्रभाग क्रमांक 9 मधील भाजपचे उमेदवार युवराज दगडू लोणारी आणि पुनम वसंत पाटील यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज नगराध्यक्षपदाच्या भाजपा -शिवसेना- रिपाई महायुतीच्या उमेदवार सौ.रजनी संजय सावकारे यांनी फित कापून केलेले आहे.
दरम्यान ,याप्रसंगी प्रभाग क्रमांक 9 मधील महिला व पुरुषांसह शेकडो मतदारांचा मोठा जनसमुदाय प्रचार मिरवणुकीत सहभागी होता. यामुळे प्रभागात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच घरोघरी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी सावकारे यांचे उमेदवारांचे महिलांनी औक्षण करून स्वागत केलेले आहे. प्रभागातील प्रत्येक गल्लीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रजनी सावकारे यांना मतदारांकडून उदंड प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Join WhatsApp