Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्र

भुसावळात ‘हात की सफाई ‘,बसस्थानकात 3.20 लाखांच्या 22 ग्रॅम सोन्याच्या पोत चोरीप्रकरणी महिला आरोपी ताब्यात; वाढत्या चोरीच्या घटनांमुळे चिंता

चोरट्यांमुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण

भुसावळ, दि. 26 एप्रिल 2026 — भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने भुसावळ बसस्थानक परिसरात घडलेल्या 3 लाख 20 हजार रुपये किमतीच्या 22 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पोत चोरीप्रकरणी एका महिला आरोपीला ताब्यात घेऊन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी आरोपीकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुसुम देविदास चौधरी (वय 62, व्यवसाय – गृहिणी, रा. शिवराय नगर, मुक्ताईनगर, ता. मुक्ताईनगर) यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनुसार, दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8.00 ते 8.30 वाजेच्या सुमारास फिर्यादी भुसावळ बस स्टँड येथे चोपडा बसमध्ये चढत असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधून 22 ग्रॅम वजनाची व 3,20,000 रुपये किमतीची सोन्याची पोत लबाडीने चोरून नेली होती. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 194/2026, बी.एन.एस. 2023 कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक जळगाव श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ विभाग श्री. केदार बारबोले तसेच पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.
तपासादरम्यान भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकातील पोहेकॉ 2692 विजय नेरकर, पोहेकॉ 3077 कांतीलाल केदारे, पोहेकॉ 2820 सचिन चौधरी, पो.कॉ. 611 महेंद्र पाटील, पो.कॉ. 3472 अक्षय कोतकर, पो.कॉ. 293 योगेश माळी, पो.कॉ. 2342 चंद्रकांत रायपुरकर, पो.कॉ. 59 जावेद शहा, पो.कॉ. 272 भुषण चौधरी, पो.कॉ. 1817 अमर अवाडे, पो.कॉ. 1980 दिलीप कोळे, पो.कॉ. 279 जिवन कापडे, पो.कॉ. 710 हर्षल महाजन, मपोकॉ 3311 शिल्पा राठोड यांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू ठेवला होता.
यावेळी पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत चोरी करणाऱ्या महिला आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कुलसुमबी मुस्ताक शेख (रा. यावल हिसा) हिला ताब्यात घेतले आहे.
चौकशीदरम्यान संबंधित महिला आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरीस गेलेली 3,20,000 रुपये किमतीची 22 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जप्त करण्यात आली. त्यामुळे हा चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ 3077 कांतीलाल रघुनाथ केदारे हे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले व पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या आदेशाने करीत आहेत.
दरम्यान, भुसावळ बसस्थानक परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांवर चिंता व्यक्त करण्यात येत असून, याठिकाणी सकाळपासूनच पोलिस बंदोबस्ताची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp