राजकीय

मंत्री गिरीश महाजन होणार उपमुख्यमंत्री ? देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम,आज रात्री मोठा निर्णय ?

मुंबई ,दिनांक:7 जून,आज दिल्लीत एनडीएच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या भेटीसाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यांच्यासोबत खासदार रक्षा खडसे आणि स्मिता वाघ या देखील होत्या अशी माहिती समोर आलेली आहे. विशेष म्हणजे फडणवीस प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील प्रफुल्ल पटेल यांच्या घरी दाखल झाले होते.आता प्रफुल्ल पटेल यांच्या घरी महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत झालेल्या महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आहे. इतकंच नाहीतर यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये यासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले मात्र तरीही फडणवीस हे आपल्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर महाराष्ट्रात भाजपचा उपमुख्यमंत्री कोण असेल ? त्यांच्याकडे असणारं गृहमंत्री पदाचं खातं नेमकं कोणाकडे दिलं जाणार ? असे अनेक सवाल असताना  सूत्रांकडून मोठी माहिती समोर आलेली आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले भाजपचे नेते गिरीश महाजन हे महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्रीपदी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गिरीश महाजन हे सध्या राज्यातील भाजपचे दोन नंबरचे नेते आहेत. महाजन यांची पक्षाचे संकटमोचक नेते म्हणून ओळख आहे. याशिवाय ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते मानले जाता. त्यामुळे अधिकृत निर्णय काय येणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.आज रात्रीपर्यंत यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031
Back to top button