स्टँप विक्रेत्याने ५०० रुपयांच्या स्टँपपेपरसाठी अतिरिक्त ५०० रुपये लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल
स्टॅम्पपेपर विक्रेता सुद्धा लोकसेवकाच्या व्याख्येत येतो

जळगाव, १७/03/२०२६: पाचोरा पोलिस स्टेशन हद्दीतील स्टँपपेपर विक्रेता योगेश ईश्वरलाल संघवी (वय ४९) आणि त्याचा भाऊ प्रशांत ईश्वरलाल संघवी (वय ५३, झेरॉक्स दुकानदार) यांना लाच घेताना लाच प्रतिबंधक विभाग (एसीबी), जळगाव यांनी यशस्वी सापळा रचून पकडले आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ व ७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारकर्ता:हेमंत खंडू नागरे, पोलिस निरीक्षक, लाच प्रतिबंधक विभाग, जळगाव.
आरोपींची नावे:
१. योगेश ईश्वरलाल संघवी (४९ वर्षे), व्यवसाय – स्टँप विक्रेता, भुसावळ.
२. प्रशांत ईश्वरलाल संघवी (५३ वर्षे), व्यवसाय – झेरॉक्स दुकान (खाजगी), दोघांचे राहते ठिकाण – प्लॉट नं. ४१, विवेकानंद नगर, भडगाव रोड, पाचोरा, जि. जळगाव.
लाचेची रक्कम:
– मागणी केलेली एकूण रक्कम – ५,५०० रुपये
– स्टँप्सची शासकीय किंमत – ५,००० रुपये (५०० रुपये दराच्या १० स्टँप्स)
– अतिरिक्त लाच – ५०० रुपये (५०० रुपये दराच्या ११ चलनी नोटा स्वरूपात स्वीकारलेली)
घटनाक्रम असा…
१५ मार्च २०२६ रोजी तक्रारकर्ता हेमंत नागरे यांनी पाचोरा शहरातील जामनेर-पाचोरा रोडवरील प्रशांत झेरॉक्स दुकानाजवळील स्टँप विक्रेता योगेश संघवी यांच्याकडे ५०० रुपये दराच्या १० स्टँप्स घेण्यासाठी गेला होता. स्टँप्सची शासकीय किंमत ५,००० रुपये असताना आरोपी योगेश यांनी ५,५०० रुपये मागितले. तक्रारकर्त्याने शासकीय नियमांनुसार ५,००० रुपयेच द्यावे लागतील असे सांगितले असता, आरोपीने “५५० रुपये द्या, कमी होणार नाही” असे सांगितले. आधार कार्ड नसल्याने स्टँप देणार नाही, आधार घेऊन या असे म्हणाले. यामुळे तक्रारकर्ता त्या दिवशी परत गेला.
१७ मार्च २०२६ रोजी वैयक्तिक कामासाठी पुन्हा तक्रारकर्ता त्याच ठिकाणी गेला. तेव्हा आरोपी योगेश संघवी यांनी पुन्हा ५,००० रुपयांच्या स्टँप्ससाठी अतिरिक्त ५०० रुपये लाच मागितली. तक्रारकर्त्याला लाच देण्याची इच्छा नसतानाही, लाच न दिल्यास स्टँप न देण्याची धमकी दिली गेली. यानंतर तक्रारकर्त्याने तात्काळ लाच प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली.
एसीबीने तात्काळ सापळा रचला आणि आरोपी योगेश संघवी यांनी लाच मागितली आणि त्यांच्या भावाने (प्रशांत संघवी) लाच रक्कम ५०० रुपये स्वतः स्वीकारली. सापळ्यात लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले. स्टॅम्प पेपर विक्रेता हा सुद्धा लोकसेवक या संज्ञेत येतो.
सापळा कारवाईत सहभागी अधिकारी:
– पर्यवेक्षण अधिकारी – श्री. योगेश ठाकूर, पोलिस उपअधीक्षक, ला.प्र.वि. जळगाव
– सापळा अधिकारी – श्री. हेमंत नागरे, पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगाव
– सापळा पथक – पो.अ. बाळू मराठे, पो.अ. भूषण पाटील
– तपास अधिकारी – श्रीमती स्मिता नवघरे, पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगाव
मार्गदर्शन:
– पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र
– अपर पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र
एसीबीचे आवाहन:
लाच प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य नागरिकांना आवाहन करत आहे की, कोणत्याही सरकारी कर्मचारी किंवा लाच मागणाऱ्या व्यक्तींबाबत माहिती असल्यास तक्रार दाखल करावी.
संपर्क:
– वेबसाइट – acbmaharashtra.gov.in / acbmaharashtra.net
– ई-मेल – spacbnashik@mahapolice.gov.in / dyspachjalgaon@gmail.com
– टोल फ्री – १०६४
– दूरध्वनी – ०२५७-२२३५४७७
या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. लाच घेणारे सरकारी सेवक किंवा खासगी एजंट यांच्यावर थेट गुन्हे दाखल होतील, असा इशारा पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी दिला आहे. ही कारवाई लाच विरोधातील सरकारच्या “झिरो टॉलरन्स” धोरणाची दखल घेण्याजोगी आहे.













